सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:18 AM2024-04-16T11:18:17+5:302024-04-16T11:19:01+5:30

Sangli Lok sabha Election - सांगली जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील तिढा अद्याप सुटला नसल्याचं दिसून येते. गुढीपाडव्याला महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत ही जागा ठाकरे गटाला दिली आहे.

Sangli Lok Sabha Election - Vishal Patil has filed 2 applications as Congress and Independent. Shock to Thackeray group candidate Chandrahar Patil | सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

नागपूर - सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील दुरावा आणखीच वाढला आहे. सांगलीच्या जागेबाबत तोडगा निघावा यासाठी स्थानिक नेते आजही प्रयत्नशील आहेत. परंतु याठिकाणी इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी २ अर्ज दाखल केले आहेत. त्यात एक काँग्रेस आणि एक अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. 

सांगलीच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची काँग्रेसनं बैठक घेतली. या बैठकीला आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. विश्वजित कदम म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला तात्काळ चर्चेसाठी नागपुरात बोलावलं, त्याकरता मी आलो. रमेश चेन्निथला यांच्यासोबतही फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका आम्ही मांडली. विशाल पाटलांच्या अर्जासोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. मात्र, शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले. एक काँग्रेस पक्ष आणि एक अपक्ष असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज्याच्या आणि देशाच्या ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहे. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण जी सांगलीची परिस्थिती सध्या उद्भवली आहे त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी करीता अत्यंत चांगलं वातावरण आहे. यासाठी काय निर्णय घ्यायचे ते ज्येष्ठांनी ठरवावं असंही विश्वजित कदम यांनी म्हटलं. 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे. यातून काय घडतं ते त्या त्या निवडणुकीचा शेवटच्या क्षणापर्यंत कळत असतं. त्यामुळे मी यावर जास्त बोलणार नाही. काल मी जी काही परिस्थिती मांडली आहे त्यातून राज्याचे आणि देशाचे नेते नक्कीच मार्ग काढतील असा विश्वासही विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: Sangli Lok Sabha Election - Vishal Patil has filed 2 applications as Congress and Independent. Shock to Thackeray group candidate Chandrahar Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.