रामदास आठवले यांच्या अनोख्या घोषणा; एकच पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 12:22 IST2019-04-22T12:21:46+5:302019-04-22T12:22:43+5:30

नरेंद्र मोदी येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी रामदास आठवले यांचेही भाषण झाले.

Ramdas Athavale's unique slogans; Laughing in modi's rally | रामदास आठवले यांच्या अनोख्या घोषणा; एकच पिकला हशा

रामदास आठवले यांच्या अनोख्या घोषणा; एकच पिकला हशा

नाशिक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी नेहमीच हास्याचे कारंजे उठतात. नेहमीप्रमाणेच आठवले यांनी आज दिंडोरी मतदारसंघातील पिंपळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी काही काव्यात्मक घोषणा दिल्या. यामुळे सभास्थळी एकच हशा पिकला होता. 


नरेंद्र मोदी येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी रामदास आठवले यांचेही भाषण झाले. नेहमी वेगळ्या धाटणीचे भाषण देण्यात पटाईत असलेले आठवलेंनी यावेळीही कविता करत मोदींची स्तुती केली. तसेच काही घोषणाही त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या. 


नरेंद्र मोदी चौकीदार, राहुल गांधी भागीदार; 
नरेंद्र मोदी विकासपुरुष, राहुल गांधी भकासपुरुष;
नरेंद्र मोदी फकीर हैं, राहुल गांधी अमीरो की लकीर हैं;
आमच्याकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आहे जंत्री, 
म्हणून मोदी होणार पुन्हा प्रधानमंत्री...


 असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा  पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले. या त्यांच्या प्रत्येक काव्यपंक्तीला त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासोबत सद्सद् विवेकबुद्धी देखील राहिलेली नाही, असा आरोप केला. तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगवास भोगला, असे सांगून भुजबळांना टोला हाणला. 
 

 

Web Title: Ramdas Athavale's unique slogans; Laughing in modi's rally