PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:56 IST2025-12-31T20:53:55+5:302025-12-31T20:56:19+5:30
Narendra Modi Tweet In Marathi: महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला अधिकृत मंजुरी दिली. हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे. नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क मराठीतून ट्वीट केले.
हा रस्ता पूर्णपणे नवीन मार्गावरून विकसित केला जाणार असल्याने याला ग्रीनफिल्ड कॉरिडॉर म्हटले जात आहे. नाशिक ते सोलापूर आणि पुढे अक्कलकोटपर्यंतचा प्रवासाचा कालावधी या कॉरिडॉरमुळे लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरेल.
विकासासाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांची उभारणी!
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2025
मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक–सोलापूर–
अक्कलकोट या 6 पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीतून ट्वीट
"मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल", असे मोदी म्हणाले.
आर्थिक आणि औद्योगिक फायदे:
- शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादनांची वाहतूक जलद होणार असल्याने लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
- या महामार्गाच्या बांधकामादरम्यान आणि त्यानंतर महामार्गालगत विकसित होणाऱ्या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार उपलब्ध होतील.
- सोलापूर आणि स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.