Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:51 IST2024-11-23T11:49:22+5:302024-11-23T11:51:43+5:30
Nanded Lok Sabha By Election Results 2024 Updates : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर गेला आहे.

Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
Nanded Lok Sabha By Election Results : विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही ही भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे सुपूत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली होती. भाजपने सुरूवातीच्या काही फेऱ्यानंतर आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण हे विजयी झाले होते. त्यांचे आजारामुळे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली. तर काँग्रेसने उमेदवार बदलून संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली होती.
वाचा >> महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट!
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. पण, हळूहळू त्यांचे मताधिक्य कमी होतं गेले. काही फेऱ्या पार पडल्यानंतर संतुकराव हंबर्डे यांनी मुसंडी मारली.
दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनंतर संतुकराव हंबर्डे यांनी ७ हजार ७२४ मतांची आघाडी घेतली. रवींद्र चव्हाण यांना १ लाख १० हजार ९२३ मते मिळाली. संतुकराव हंबर्डे यांना १ लाख १८ हजार ६४७ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांना १७ हजार ३५१ मते मिळाली.