माझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:46 IST2019-05-29T11:22:38+5:302019-05-29T11:46:29+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल, असा आशिर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.

My children are as big, blessings of Dhariyal Mane given by Raju Shetty's mother | माझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वाद

माझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वाद

ठळक मुद्देमाझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशिर्वादराजू शेट्टींची शिरोळ येथील निवासस्थानी घेतली भेट

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहिल, असा आशिर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.



लोकमतला मंगळवारी जेव्हा धैर्यशील माने यांनी भेट दिली, त्यावेळीच त्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणे त्यांनी बुधवारी सकाळीच शिरोळ येथील शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
ज्यांच्या विरोधात लढले, त्यांच्याच घरी जाऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका वेगळ्या परंपरेचा पायंडा या मतदारसंघात पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नेत्यांमध्ये टोकाची इर्ष्या पाहायला मिळाली असताना विरोधकाच्या घरी जाउन प्रतिस्पर्ध्यांची भेट घेत एक वेगळाच संदेश माने यांनी दिला आहे. धैर्यशील माने सुद्धा माझ्या नातवासारखे आहेत, जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा, असा आशीर्वाद शेट्टींच्या आईंनी माने यांना दिला.

तुम्हाला भेटायला म्हणून मी खास आलोय, असे माने राजू शेट्टी यांच्या आईचे पाया पडून आशिर्वाद घेताना म्हणाले. आशिर्वाद माझा भरपूर आहे, माझा मुलगा जसा केला, तसे कर, माझा आशिर्वाद मोठा आहे, असा आशिर्वाद त्यांनी दिला. तुमच्या आशिर्वादाने सगळेच चांगले होतेय, तुमचा आशिर्वाद असल्यावर काही कमी पडणार नाही, असे माने यांनी सांगितले.


यावेळी शेट्टी यांनीही माने यांना लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडावेत असा सल्ला दिला. माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला, जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

यावेळी फेटा बांधून पुष्पगुच्छ देत राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने यांचा सत्कार केला. राजू शेट्टी यांच्या घरात यावेळी माने यांचे औक्षणही केले. या भेटीप्रसंगी धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि राजू शेट्टी यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Web Title: My children are as big, blessings of Dhariyal Mane given by Raju Shetty's mother