Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result | महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपा-शिवसेना महायुतीला राज्यात ४१ जागांवर विजय मिळाला. मात्र या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. 

शिवसेनेचे अनंत गीते, आनंदराव अडसुळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीचा हा ट्रेंड राज्यात कायम राहिला तर विधानसभा निवडणुकीतही राज्यातील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला राज्यात ५६ जागांवर आघाडी मिळाली होती. तर महायुतीला २३२ जागांवर आघाडी मिळाली होती. लोकसभा निवडणूक निकालांचा हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर दिग्गज उमेदवारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, भाजपाचे सुधीर मुनगुंटीवार, आशिष शेलार यांना पराभवाचा सामना करावा लागेल. 

काँग्रेस-राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकांमध्ये नंदूरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, नवापूर, साक्री, धुळे लोकसभा - मालेगाव मध्य, अमरावती लोकसभा - अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट नागपूर - नागपूर उत्तर, चंद्रपूर - राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, नांदेड लोकसभा - भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, परभणी लोकसभा - परभणी, पाथर्री, दिंडोरी लोकसभा - दिंडोरी, पालघर लोकसभा - डहाणू, विक्रमगड, वसई, भिवंडी लोकसभा - भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण लोकसभा - मुंब्रा कळवा, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा - दिंडोशी, मुंबई उत्तर पूर्व - मानखुर्द शिवाजीनगर, मुंबई उत्तर मध्य - वांद्रे पूर्व, मुंबई दक्षिण मध्य - धारावी,दक्षिण मुंबई - भायखळा, मुंबादेवी, रायगड लोकसभा - अलिबाग, श्रीवर्धन, मावळ लोकसभा - कर्जत, बारामती लोकसभा - इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, शिरुर लोकसभा - जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, हडपसर शिर्डी - अकोले, सोलापूर लोकसभा - मोहोळ, पंढरपूर  माढा - करमाळा, माढा, सांगोला, सांगली लोकसभा - पलूस-कडेगाव, सातारा लोकसभा - वाई, कोरेगाव, कराड उत्तर, सातारा शहर, कोल्हापूर लोकसभा - कागल, हातकणंगले लोकसभा - शिरोळ, इस्लामपूर, शिराळा अशा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. 

बल्लारपूर मतदारसंघात भाजपाचे सुधीर मुनगुंटीवार तर वांद्रे पूर्व येथून आशिष शेलार विद्यमान आमदार आहेत. याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती. तर येवला या छगन भुजबळ आणि कराड दक्षिणेतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाला आघाडी मिळाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील लोकांचा मूड आणि विधानसभा निवडणुकीतील स्थानिक गणित वेगळी असतात. त्यामुळे या जागांवर चित्र येत्या २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे. 
 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.