Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात

LIVE

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 19:06 IST2024-12-05T15:12:25+5:302024-12-05T19:06:53+5:30

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला. ...

maharashtra cm swearing in ceremony live updates in marathi devendra fadnavis eknath shinde ajit pawar | Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात

Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर आता ०५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनधरणी केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समजते. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मंत्री, अनेक दिग्गज मंडळी, संत-महंत, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. जाणून घ्या, या शानदार सोहळ्याचे लाइव्ह अपडेट्स...  

LIVE

Get Latest Updates

05 Dec, 24 : 06:40 PM

शपथबद्ध झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रालयात; छत्रपती शिवरायांना केले अभिवादन

आझाद मैदानावरील शपथविधीचा भव्य सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात दाखल झाले. येथे तिघांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. 

05 Dec, 24 : 06:26 PM

तीनही नेत्यांना मी अंत:करणापासून शुभेच्छा देतो: संजय बनसोडे

05 Dec, 24 : 06:02 PM

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष

05 Dec, 24 : 05:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

05 Dec, 24 : 05:49 PM

राष्ट्रगीताने महायुतीच्या भव्य शपथविधी सोहळ्याची सांगता

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रगीताने या शपथविधीच्या भव्य सोहळ्यांची सांगता झाली. 

05 Dec, 24 : 05:43 PM

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

05 Dec, 24 : 05:40 PM

एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

05 Dec, 24 : 05:35 PM

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

05 Dec, 24 : 05:33 PM

शपथविधीच्या भव्य सोहळ्यात राष्ट्रगीतानंतर सादर झाले महाराष्ट्र गीत. 

05 Dec, 24 : 05:32 PM

पंतप्रधान मोदी आझाद मैदानात पोहोचले; महायुती सरकारच्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याची दिमाखदार सुरुवात

05 Dec, 24 : 05:29 PM

राष्ट्रगीताने महायुती सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्यास प्रारंभ

05 Dec, 24 : 05:23 PM

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचले

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले असून, अवघ्या काही वेळात आझाद मैदानात पोहोचत आहेत.
 

05 Dec, 24 : 05:12 PM

शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतले आईचे आशीर्वाद

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आझाद मैदानावर जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आईचे आशीर्वाद घेतले. आईने देवेंद्र फडणवीसांचे औक्षण केले. या भावनिक क्षणाचा फोटो देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला असून, मायेचे औक्षण! आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ..., असे कॅप्शन दिले आहे.

05 Dec, 24 : 04:56 PM

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला उपस्थित

महायुती सरकारच्या शपथविधीच्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला, रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी, अभिनेता रणवीर सिंह, शाहरुख खान, रणबीर कपूर उपस्थित झाले आहेत.

05 Dec, 24 : 04:50 PM

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर आझाद मैदानात

थोड्याच वेळात महायुतीचा शपथविधी सोहळा सुरू होत असून, नेते, पदाधिकारी आझाद मैदानात पोहोचत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर आझाद मैदानात पोहोचले आहेत. तसेच खासदार नारायण राणे, आमदार अनिल पाटील, आमदार गुलाबराव पाटील पोहोचले आहेत.

05 Dec, 24 : 04:48 PM

गौतम अदानी शपथविधीसाठी आझाद मैदानावर दाखल

थोड्याच वेळात महायुतीचा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. त्यासाठी अनेक जण आझाद मैदानात पोहोचत आहेत. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी, अभिनेते सुबोध भावे, अर्जुन कपूर, आमदार शिवेंद्र राजे, राहुल नार्वेकर उपस्थित झाले आहेत.

05 Dec, 24 : 04:41 PM

एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाकडे रवाना

05 Dec, 24 : 04:31 PM

शपथविधी सोहळ्यासाठी डोंबिवलीतून महायुतीचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी डोंबिवलीतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागातून एक बस अशा दोनशे बस रवाना झाल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. 

05 Dec, 24 : 04:21 PM

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीपूर्वी पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

05 Dec, 24 : 04:19 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत

05 Dec, 24 : 04:10 PM

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मुंबईत दाखल

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मुंबईत दाखल झाले आहेत.

05 Dec, 24 : 04:08 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा महायुती सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले.

05 Dec, 24 : 04:05 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?

पंतप्रधान नरेंद्र मोदी,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मंता बिस्वा, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल,  बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, अरुणाचल सीएम पेमा खंडू, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी मुंबईत आले आहेत.

05 Dec, 24 : 04:03 PM

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत पोहोचले. पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन झाले असून, आता महाराष्ट्राचा विकास वेगाने होईल.

05 Dec, 24 : 03:56 PM

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू मुंबईत

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू मुंबईत पोहोचले. एनडीए आणि भाजपा शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री  शपथविधी सोहळ्यास येत आहेत.

05 Dec, 24 : 03:48 PM

शपथविधीसाठी आसनव्यवस्था निश्चित

अवघ्या काही वेळातच महायुती सरकराचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाची आसनव्यवस्था निश्चित झाली आहे. 

05 Dec, 24 : 03:35 PM

अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष

अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा शपथ घेणार त्या निमित्ताने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्रमुख नेत्यांचे पोस्टर झळकावले. ढोल ताशाच्या गजरात आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

05 Dec, 24 : 03:33 PM

‘एक हैं तो सेफ हैं’चे टी-शर्ट परिधान केलेले तरुण कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यास दाखल

05 Dec, 24 : 03:31 PM

आसामचे मुख्यमंत्री मुंबईत; शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित

05 Dec, 24 : 03:30 PM

अजित पवारांच्या समर्थकांची बंगल्याबाहेर गर्दी

अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समर्थक मोठ्या प्रमाणात मुंबईत आले आहेत. अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचे दिसून आले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

05 Dec, 24 : 03:28 PM

पंतप्रधान मोदी काहीच वेळासाठी उपस्थित राहणार

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळच उपस्थित राहणार आहेत. तिघांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच ते निघणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे मोदी यांच्याकडे जास्त वेळ नसल्याने मंत्रिमंडळाचा शपथ सोहळा आज होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

05 Dec, 24 : 03:21 PM

महायुतीचे तिन्ही नेते आज शपथ घेणार असल्याचे स्पष्ट

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणाऱ्या आझाद मैदानावर तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या शपथविधीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे जरी येणार नसले तरी राज्यभरातून कार्यकर्ते जाणार आहे. महनीय व्यक्तींना निमंत्रण पत्रिकाही पोहोचल्या आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या मंडपाची पहिली झलक समोर आली आहे.  अखेर शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंची भेट घेत त्यांची यशस्वी समजूत काढली आहे. यामुळे महायुतीचे तिन्ही नेते आज शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

05 Dec, 24 : 03:18 PM

एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची इच्छा आहे: उदय सामंत

मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. या मागणीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही आणि ती जबाबदारी आमच्यातील इतर कोणावर टाकण्याचा प्रयत्न केला तर आमच्यातील कोणीही ती जबाबदारी स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांनाच आम्ही नेते मानलं आहे आणि आमचं राजकीय करिअर त्यांच्या हाती सोपवलं आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

05 Dec, 24 : 03:16 PM

शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातून पारंपारिक वेशभुषेत कोळी बांधव मुंबईसाठी रवाना

महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथून अनेक कोळी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. महागिरी कोळी वाड्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी व नम्रता कोळी यांच्या माध्यमातून सर्व कोळी बांधवांना आझाद मैदान येथे घेऊन जाण्यात येणार आहे. पारंपारिक कोळी वेशभूषा परिधान करत कोळी बांधव मोठ्या जल्लोषात मुंबईकडे रवाना होणार आहेत. कोळी बांधवांचे व कोळीवाड्यांचे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे आणि गेले पाच वर्षे आम्ही देवा भाऊंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याची वाट पाहत होतो आता तो आनंदाचा क्षण आला आहे म्हणून आम्ही सर्व देवा भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला जात आहोत अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे.

05 Dec, 24 : 03:16 PM

शिवसेना शिंदे गटाचे आमदार वर्षा बंगल्यावर दाखल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय गायकवाड यांच्यासह काही आमदारांचा यात समावेश आहे.

05 Dec, 24 : 03:15 PM

आमदार प्रताप सरनाईक काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

05 Dec, 24 : 03:15 PM

शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातून लाडक्या बहिणी मुंबईकडे रवाना

महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातून लाडक्या बहिणी मुंबईला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून त्यांनी केलेला लाडक्या भगिनींसाठीच्या कामाची पोच पावती म्हणून आम्ही सर्व भगिनी त्यांच्या शपथविधीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसाठी जात असल्याचे मत लाडक्या बहिणींनी व्यक्त केले आहे. 

Web Title: maharashtra cm swearing in ceremony live updates in marathi devendra fadnavis eknath shinde ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.