जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:39 IST2024-11-15T16:38:28+5:302024-11-15T16:39:13+5:30
Pankaja Munde Helicopter Nashik: आज सकाळी १० वाजता पंकजा मुंडे सिडकोतील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ सभा घेणार होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक सकाळपासूनच जमले हेाते.

जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
- संजय पाठक
नाशिक : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची आज सकाळी १० वाजता नाशिक शहरातील पश्चिम मतदारसंघातील सिडको येथे जाहीर सभा होती. त्यानंतर त्या निफाड तालुक्यात सायखेडा येथे सभा घेणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटकडून चुकीचा रूट टाकला गेल्याने मुंडे यांचे हेलिकॉप्टर नाशिकऐवजी थेट सायखेड्याला गेले आणि गोंधळ उडाला.
आज सकाळी १० वाजता त्या सिडकोतील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ सभा घेणार होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक सकाळपासूनच जमले हेाते. सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याने पदाधिकारी तेथेच त्यांची वाट पाहत होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत त्या सिडकोत आल्याच नाहीत. नाशिकऐवजी त्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे हेलिकॉप्टरने पोहोचल्या.
हेलिकॉप्टरच्या पायलटला सायखेडा आणि सिडको अशा दोन्ही ठिकाणांचे अक्षांश, रेखांश देण्यात आले होते. मात्र, त्याने सिडकोऐवजी पहिले सायखेड्याचे अक्षांश, रेखांश टाकल्याने हा गोंधळ झाला.