नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 06:47 IST2024-10-27T05:26:44+5:302024-10-27T06:47:02+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना उद्धवसेनेने मैदानात उतरवले आहे.

नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
मुंबई : उद्धवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी १८ उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध संदेश पारकर यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध पवन जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे.
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना उद्धवसेनेने मैदानात उतरवले आहे. भाजपसह अन्य पक्षांमध्ये राहिलेले गोटे आता उद्धवसेनेकडून जळगावमध्ये
लढतील. नाशिकच्या देवळालीतून उमेदवारी मिळालेले योगेश घोलप हे २०१४ मध्ये आमदार होते. ते माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र आहेत.
बुलढाण्यात रंगतदार लढत
बुलढाण्यात शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा सामना उद्धवसेनेच्या जयश्री शेळके यांच्याशी होईल. त्या बरीच वर्षे मराठा सेवा संघात सक्रिय होत्या.