देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:30 PM2024-04-18T12:30:15+5:302024-04-18T12:30:52+5:30

loksabha Election 2024 - शरद पवार भाजपासोबत येणार होते, अनेकदा त्याबाबत चर्चा झाली होती असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले आहे. 

Lok Sabha Elections 2024 - After Sharad Pawar's resignation, Supriya Sule-led NCP Party would join the Mahayuti, claims Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर...

देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर...

मुंबई - Devendra Fadnavis on Sharad Pawar ( Marathi News ) शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी भाजपाशी चर्चा झाली होती. ते अनेकदा भाजपासोबत येणार होते. २०१९ ची चर्चाही शरद पवारांसोबत होती अशाप्रकारचे दावे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार अनेकदा आमच्यासोबत येणार होते, आमची २०१९ ला शरद पवारांशीच चर्चा झाली होती. इतर कुणाशी नाही. त्यानंतर अजित पवारांना वेळेवर तोंडघशी पाडण्यात आलं हे सर्वांनी बघितलं. अजित पवारांनी अपमानित व्हायचं आणि नेतृत्व यांनीच करायचे. अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावेळीही आमच्याशी चर्चा झाली होती. पवार अध्यक्षपद सोडून सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष महायुतीत येईल असं सांगितल्याचंही फडणवीसांनी म्हटलं. 

तसेच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण कुणी सुरू केले? शिवसेना कुणी फोडली? १९९२ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले. आज गोपीनाथ मुंडेंचं घर कुणी फोडले? त्यामुळे आम्ही केले तर ते राजकारण आणि त्यांनी केले तर तो राजकीय मुत्सदीपणा, एखादी गोष्ट घडली आणि त्याचा आम्हाला फायदा झाला तर राजकीय पातळी खाली गेला, घर फोडले, अशाप्रकारची विधाने दुटप्पीपणा आहे असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. न्यूज १८ मराठीला फडणवीसांनी मुलाखत दिली त्यात ते बोलले. 

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पुत्रमोह, पुत्रमोहीमुळेच फुटले, अमित शाह यांनी केलेले विधान १०० टक्के खरे आहे. अजितदादांना बाहेर का पडावं वाटलं? अजितदादांची पक्षात कुंटबणा कुणी केली? सातत्याने अजितदादा मुख्य प्रवाहात गेले पाहिजे सांगत होते, अजित पवारांच्या हाती नेतृत्व जातंय हे दिसत असल्याने त्यांची कुंचबणा करण्यात आली. त्यातून त्यांना बाहेर पडावं वाटलं. ज्यावेळी हे पक्ष फुटले, शेवटी आम्ही राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेतले असंही फडणवीसांनी खुलासा केला. 

धनुष्यबाणाच्या आग्रहामुळे राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा

राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा पहिल्यांदा दिलाय का?, २०१४ साली नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. मोदींचं नाव पुढे करणारे हे राज ठाकरे होते. २०१९ ला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. त्यांना एकतरी जागा दिली होती, ते एकही जागा लढले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंनी काही वेगळे केलंय हे मानण्याचं कारण नाही. आमची राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू होती. त्यांना जी जागा हवी होती ती शिवसेनेकडे होती. परंतु शिवसेनेचा आग्रह होता, ती जागा त्यांच्या चिन्हावर लढली पाहिजे. त्यावेळी राज ठाकरेंनी नकार देत माझं चिन्ह आहे, लढलो तर माझ्या चिन्हावर लढेन असं सांगितले, हे होणार नसेल तर मी मोदींना पाठिंबा देईन, आपण विधानसभेला पाहू असं राज यांनी म्हटल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 - After Sharad Pawar's resignation, Supriya Sule-led NCP Party would join the Mahayuti, claims Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.