महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:54 IST2024-12-15T19:52:14+5:302024-12-15T19:54:50+5:30

Maharashtra Cabinet Expansion List: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात पार पडला. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

How many ministerial posts will each district have in the new cabinet of the Mahayuti government? | महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे?

महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे?

Maharashtra New Cabinet Minister List: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मंत्रिमंडळ विस्तारात काही विभागांच्या पारड्यात जास्त मंत्रि‍पदे पडली आहेत. कोणत्या विभागातील आणि जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांचे मंत्रि‍पदाची इच्छा पूर्ण झाली, जाणून घेऊयात.

महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाल्याने तिन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे कोणाला संधी दिली जाणार, याबद्दल उत्सुकता होती. तिन्ही पक्षांनी मोठी कसरत करत जुन्या नेत्यांना बाजूला सारत नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.  

- चंद्रशेखर बावनकुळे : नागपूर, विदर्भ

- राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र

- हसन मुश्रीफ : कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र

- चंद्रकांत पाटील : पुणे, पश्चिम महाराष्ट्र

- गिरीश महाजन : जळगाव, उत्तर महाराष्ट्र

- गुलाबराव पाटील : जळगाव, उत्तर महाराष्ट्र

- गणेश नाईक : नवी मुंबई (ठाणे), कोकण

- दादा भुसे : नाशिक, उत्तर महाराष्ट्र

- संजय राठोड : यवतमाळ, विदर्भ

- धनंजय मुंडे : बीड, मराठवाडा

- मंगलप्रभात लोढा : मुंबई, कोकण

- उदय सामंत : रत्नागिरी, कोकण

- जयकुमार रावल : धुळे, उत्तर महाराष्ट्र

- पंकजा मुंडे : बीड, मराठवाडा

- अतुल सावे : छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा

- अशोक उईके : यवतमाळ, विदर्भ

- शंभूराज देसाई : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

- आशिष शेलार : मुंबई, कोकण

- दत्तात्रय भरणे : पुणे, पश्चिम महाराष्ट्र

- आदिती तटकरे : रायगड, कोकण

- शिवेंद्रराजे भोसले : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

- माणिकराव कोकाटे : नाशिक, उत्तर महाराष्ट्र
 
- जयकुमार गोरे : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

- नरहरी झिरवळ : नाशिक, उत्तर महाराष्ट्र

- संजय सावकारे : जळगाव, उत्तर महाराष्ट्र

- संजय शिरसाट : छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा

- प्रताप सरनाईक : ठाणे, कोकण

- भरत गोगावले : रायगड, कोकण

- मकरंद पाटील : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

- नितेश राणे : सिंधुदुर्ग, कोकण

- आकाश फुंडकर : बुलढाणा, विदर्भ

- बाबासाहेब पाटील : लातूर, मराठवाडा

- प्रकाश आबिटकर : कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र

- माधुरी मिसाळ : पुणे, पश्चिम महाराष्ट्र

- आशिष जायस्वाल : नागपूर, विदर्भ

- पंकज भोयर : वर्धा, विदर्भ

- मेघना बोर्डीकर : परभणी, मराठवाडा

- इंद्रनील नाईक : यवतमाळ, विदर्भ

- योगेश कदम : रत्नागिरी, कोकण

कोणत्या विभागात किती मंत्री?

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मंत्रिपदे दिली गेली आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे मिळून एकूण 11 मंत्री दिली गेली आहेत.

विदर्भातील 8 मंत्री असून नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातील ६ मंत्री असून, नाशिक, धुळे, जळगाव यासारख्या भागांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

मराठवाड्यातही ६ जणांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. यात बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांना झुकतं माप मिळालं आहे.

मुंबईसह कोकण विभागात ८ मंत्रि‍पदे आली आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देताना समतोल साधल्याचा दिसत आहे. 

Web Title: How many ministerial posts will each district have in the new cabinet of the Mahayuti government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.