गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:31 IST2024-12-15T15:27:10+5:302024-12-15T15:31:48+5:30

सरकार स्थापन केल्यानंतर आता महायुती सरकारच्या खातेवाटपाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गृह आणि महसूल मंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Home, Revenue portfolios to BJP, which portfolios to Shinde's Shiv Sena and Ajit Pawar's NCP? | गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?

गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?

Maharashtra Cabinet Expansion Marathi: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्षांचे जवळपास ४० आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, महायुती सरकारचे खातेवाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह खात्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह होता. पण, गृह आणि महसूल खाते भाजपकडेच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे. 

शिवसेना आग्रही, भाजपकडेच राहणार गृह खाते

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृह खात्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या नेत्यांकडून याबद्दल माध्यमांना अनेकवेळा माहिती दिली गेली. शिवसेनेचा आग्रह खातेवाटपात मान्य झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे महसूल खातेही भाजपकडेच राहणार आहे.  

आजतकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शिवसेनेची नजर असलेले गृह खाते भाजपकडेच राहणार आहे. त्याचबरोबर महसूल, जलसंपदा आणि शिक्षण ही खातीही भाजपने स्वतःकडेच ठेवली आहेत. या खात्याची जबाबदारी कोणावर असेल, हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्पष्ट होईल. 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला नगर विकास, गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, परिवहन, पर्यटन, तंत्रज्ञान, मराठी भाषा आणि एमएसआरडीसी ही खाती मिळणार आहेत. 

तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ, सहकार आणि क्रीडा या महत्त्वाच्या खात्यांसह इतरही काही खाती मिळणार आहेत.   

भाजपचे संभाव्य मंत्री

1) चंद्रशेखर बावनकुळे
2) नितेश राणे 
3) शिवेंद्रराजे भोसले 
4) चंद्रकांत पाटील 
5) पंकज भोयर
6) मंगलप्रभात लोढा 
7) गिरीश महाजन 
8) जयकुमार रावल 
9) पंकजा मुंडे
10) राधाकृष्ण विखे पाटील
11) गणेश नाईक
12) मेघना बोर्डीकर
13) माधुरी मिसाळ
14) अतुल सावे
15) आकाश फुंडकर
16) अशोक उईके
17) जयकुमार मोरे
18) संजय सावकारे
19) आशिष शेलार

Web Title: Home, Revenue portfolios to BJP, which portfolios to Shinde's Shiv Sena and Ajit Pawar's NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.