'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:39 PM2024-04-02T23:39:00+5:302024-04-02T23:41:08+5:30

Loksabha Election 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे हेमंत पाटील समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचले.

Hingoli Lok Sabha Constituency Election - Shiv Sena candidate Hemant Patil met CM Eknath Shinde | 'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

मुंबई - Hemant Patil Meet CM Eknath Shinde ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. त्यातच जाहीर झालेले उमेदवार बदलण्याची मागणी होत आहे. नुकतेच हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यात आता हेमंत पाटलांची उमेदवारी बदलली जाणार अशी चर्चा होत आहे. त्यामुळे हेमंत पाटील समर्थकांनी आज वर्षा बंगल्यावर गर्दी केली होती. या समर्थकांनी हेमंत पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केल्याचं समोर येत आहे.

हेमंत पाटलांच्या समर्थनार्थ आलेले कार्यकर्ते म्हणाले की, आज आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेकडून हजारो शिवसैनिक आलो आहोत. हेमंतभाऊंनी कोट्यवधीची कामे मतदारसंघात केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही हिंगोली जिल्ह्याला निधी दिला आहे. हेमंत पाटील यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत असं त्यांनी सांगितले. गेल्या २-३ तासांपासून मुख्यमंत्री आणि हेमंत पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. हिंगोलीत भाजपाचा विरोध पाहता उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता असल्याने हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर गर्दी केली होती. 

हिंगोलीत महाविकास आघाडीला फायदा घेता येणार?

हिंगोलीतील उमेदवाराला होणारा विरोध पाहता महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेही आता शिंदे गटाने भाजपावरची आपल्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपाच्या तीन आमदारांनी केलेल्या विरोधाचा फटका त्यांना आगामी विधानसभेतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या आमदारांचे मागील काही दिवसांत शिंदे गटाशी सख्य उरले नाही. उमरखेडमध्ये खा. पाटील यांचे कारखान्याच्या रुपाने नेटवर्क आहे. तर मागील पाच वर्षात खा. पाटील यांनी किनवटकडे सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे खा. पाटील यांना विरोध करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले भाजपाचे हे तीन आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापैकी कुणीही फार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असे नाही.

Web Title: Hingoli Lok Sabha Constituency Election - Shiv Sena candidate Hemant Patil met CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.