“राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:30 PM2024-04-18T18:30:57+5:302024-04-18T18:34:30+5:30

Congress Nana Patole: भाजपाने देशाला अधोगतीकडे नेले. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींना प्रचंड जनसमर्थन लाभले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole criticize bjp and central govt in rally for solapur lok sabha election 2024 | “राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले

“राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले

Congress Nana Patole: भारतीय जनता पक्षाने राज्यातील घरे फोडून संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी-शाह यांना खूश करण्यासाठी एकनाथ शिंदे व अजित पवार हे राहुल गांधी यांच्यावर टीका करतात. पण त्याचा काही फरक पडणार नाही. विकासात भाजपा हा मोठा अडसर ठरला आहे, हा अडसर लोकसभा निवडणुकीत दूर करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भरला, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. नरेंद्र मोदी हे फेल झालेले इंजिन असून राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा दावा नाना पटोले यांनी केला.

भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून दिला का?

श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. मात्र योजनांची सुरुवातच २०१३ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाली. भाजपा सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून दिला का, असा सवाल माकप नेते नरसय्या आडम यांनी केला. भाजपाने १० वर्षांत विश्वासाने सोलापुरकरांचा वापर करून मतदान घेतले. लोकांना गरज असताना त्यांच्याकडे पाठ फिरवली. ही लढाई आपल्या सगळ्यांची असून निवडणुकीत भाजपाला जागा दाखवून द्या. सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी या लढाईत विजयी होण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन प्रणिती शिंदेंनी केले. 
 

Web Title: congress nana patole criticize bjp and central govt in rally for solapur lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.