“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:29 IST2024-06-01T13:28:09+5:302024-06-01T13:29:04+5:30
BJP MP Medha Kulkarni News: बारामतीमधील एका सभेत अमोल मिटकरी असतील तर स्टेजवर येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मिटकरी मग तिथे आलेच नाहीत, असा एक किस्सा खासदाराने सांगितला.

“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
BJP MP Medha Kulkarni News: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान होत असून, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याविषयी इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही बाजूनी अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राजकीय वर्तुळासह जगाच्या नजरा आता ०४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागले आहे. यातच भाजपा खासदारांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे.
देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया. कोणी चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही, असे भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही
तसेच पुढे बोलताना बारामतीमधील एका कार्यक्रमाबद्दलचा किस्सा सांगताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही, असा पवित्रा अमोल मिटकरी यांच्याबाबत बारामतीमधील एका सभेत घेतला होता. अमोल मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर ते त्या सभेला आलेच नाहीत. जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा. साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. चुका आपल्या असतील तर ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणे, हे आपले काम आहे. पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचे नाही, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.