बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:27 IST2026-04-03T10:18:24+5:302026-04-03T10:27:44+5:30

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

baramati bypoll election 2026 is not unopposed congress likely field a candidate party leaders agree | बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!

बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!

Baramati Bypoll Election 2026: राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बारामतीसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी काँग्रेस मात्र बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यावर ठाम आहे. 

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना बुधवारी उमेदवारी जाहीर झाली आहे. ते पुढच्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे याहीवेळी माजी मंत्री प्राजक्त तनुपरे व कर्डिले यांच्यात लढतीची चिन्हे आहेत. अशातच आता बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलणे झाले आहे, असे म्हटले जात आहे. 

येत्या २ दिवसांत निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. राहुरी आणि बारामती विधानसभेबाबत आमच्या पक्षश्रेष्ठीसोबत बोलणे झाले आहे. यासाठी आमच्याकडे उमेदवारी मागणारे अर्ज आले आहेत. बारामतीसाठी ६ अर्ज आले आहेत आणि राहुरीमधे ४ अर्ज आले आहेत. येत्या २ दिवसांत आम्ही निवडणूक लढण्याबाबत भूमिका जाहीर करू. यापैकी काही उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राहुरी आणि बारामतीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले होते. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, कुणी उमेदवार देणार असेल, तर आम्ही ताकदीने लढू, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title : बारामती उपचुनाव: कांग्रेस उम्मीदवार उतारेगी, आलाकमान की हरी झंडी!

Web Summary : अजित पवार के निधन के बाद निर्विरोध चुनाव के प्रयासों के बावजूद, कांग्रेस बारामती में उम्मीदवार उतारेगी। पार्टी नेताओं ने संभावित उम्मीदवारों का साक्षात्कार लिया है, और जल्द ही निर्णय की घोषणा की जाएगी। बीजेपी जरूरत पड़ने पर चुनाव लड़ने को तैयार है।

Web Title : Baramati Bypoll: Congress to Field Candidate, High Command Greenlights!

Web Summary : Despite efforts for unopposed election after Ajit Pawar's death, Congress will field a candidate in Baramati. Party leaders have interviewed potential candidates, and a decision will be announced soon. BJP is ready to contest if necessary.