Bacchu Kadu : अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडू भडकले; शिवतारेंच्या वाटेवर, "वेळ आली तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:41 IST2024-03-23T16:16:52+5:302024-03-23T16:41:05+5:30
Bacchu Kadu And BJP : अमरावतीची जागा भाजपा लढवणार असून, रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu : अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडू भडकले; शिवतारेंच्या वाटेवर, "वेळ आली तर..."
राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता अमरावतीची जागा भाजपा लढवणार असून, रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. अमरावती मतदारसंघात काही मतभेद होत असतात. बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील. मात्र देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी बच्चू कडू,अडसूळ सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू आमच्यासोबत राहतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "अशा परिस्थितीत अजिबात पाठिंबा राहणार नाही. ही जी स्थिती निर्माण केलेली आहे यामध्ये मानसिकता नाहीच. वेळ आली तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ" असं म्हटलं आहे. तसेच "अमरावती लोकसभा मतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते त्या भागात आहेत. खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता. पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणं हे थोडं अंगलट येत आहे."
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडं अडचणीत येतोय, असं वाटायला लागलं आहे. वेळ आली तर आम्ही उमेदवार देवूच. सुरुवात त्यांनी तोडायची केली आहे तर आम्ही तोडू. आम्हालाही त्याचं वाईट वाटतंय. युतीतून बाहेर जायचं नाही, अशी आमची मनातील इच्छा आहे पण तुम्हाला ठेवायचंच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम नाहीत. आम्ही एवढे लाचारही नाही" असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.