अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:04 IST2024-10-23T14:03:52+5:302024-10-23T14:04:49+5:30
Ajit pawar NCP Candidate List: मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती.

अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसमधून आलेल्या दोन जणांसह 38 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचे नाव पहिल्या यादीत घेण्याचे टाळण्यात आले आहे. भाजपाचा मलिक किंवा मलिक यांच्या मुलीला उमेदवारी देण्यास विरोध आहे. यामुळे राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधीत कोणालाही तिकीट दिले तर ते स्वीकारले जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांची मलिकांचे नाव नसलेली यादी आली आहे.
नवाब मलिक दोन वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते. तेव्हापासून ते अजित पवार गटासोबत आहेत. अनेकदा ते विधानसभेतही सत्ताधारी बाकावर बसलेले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही मलिक यांनी मतदान केलेले आहे. मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाने कडाडून विरोध केला होता, तरीही अजित पवारांनी मलिकांना सोबत घेतले होते. यामुळे आताच्या विधानसभेला नवाब मलिकांना उमेदवारी देणार का याकडे भाजपाचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे मलिक यांची कन्या सना मलिक यांना उमेदवार बनवू शकतात, यालाही भाजपाने विरोध केला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही पहिली उमेदवार यादी जाहीर करत ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
अशी आहे यादी...
१. बारामती - अजित पवार
२. येवला - छगन भुजबळ
३. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील
४ कागल - हसन मुश्रीफ
५. परळी - धनंजय मुंडे
६. दिंडोरी - नरहरी झिरवाळ
७.अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
८. श्रीवर्धन - आदिती तटकरे
९. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
१०. उदगीर- संजय बनसोडे
११. अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
१२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
१३ वाई - मकरंद पाटील
१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे
१५. खेड आळंदी- दिलीप मोहिते
१६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
१७. इंदापूर - दत्तात्रय भरणे
१८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील
१९. शहापूर - दौलत दरोडा
२०. पिंपरी- अण्णा बनसोडे
२१. कळवण- नितीन पवार
२२. कोपरगाव- आशुतोष काळे
२३.अकोले- डॉ. किरण लहामटे
२४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
२५. चिपळूण- शेखर निकम
२६. मावळ- सुनील शेळके
२७. जुन्नर- अतुल बेनके
२८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने
२९. हडपसर- चेतन तुपे
३०. देवळाली- सरोज आहिरे
३१. चंदगड- राजेश पाटील
३२. इगतपुरी- हिरामण खोसकर
३३. तुमसर- राजू कारेमोरे
३४. पुसद- इंद्रनील नाईक
३५. अमरावती शहर- सुलभा खोडके
३६. नवापुर-भरत गावित
३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर
३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला