Aaditya Thackeray : "देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:36 AM2024-03-19T10:36:50+5:302024-03-19T10:46:15+5:30

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Aaditya Thackeray Slams BJP And Modi Government in Bharat jodo nyay yatra | Aaditya Thackeray : "देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

Aaditya Thackeray : "देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

भारत जोडो न्याय यात्रा रविवारी मुंबईत पोहोचली आणि त्यानंतर शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश दिला. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"सध्या आपला देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात सापडला आहे. धमक्या, भ्रष्टाचार आणि चुकीच्या माहितीच्या सहाय्याने ही राजवट फोफावली आहे. पण हे आता चालणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारत जोडो यात्रेच्या समारोपासह INDIA आघाडीने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. हे ठिकाण ऐतिहासिक आणि नावाजलेलं आहेच, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे, हे स्थळ अखंड प्रेरणा आणि उर्जेचा धगधगता स्रोत आहे."

"सध्या आपला देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात सापडला आहे. धमक्या, भ्रष्टाचार आणि चुकीच्या माहितीच्या सहाय्याने ही राजवट फोफावली आहे. ही राजवट म्हणजे देशाचा कारभार कसा चालवला जाऊ नये, ह्याचा वस्तूपाठच आहे! बेरोजगारी, महागाई, अस्थिरता, धार्मिक फूट आणि हेतुपुरस्सर द्वेष पसरवून ही राजवट राज्य करू पाहतेय. पण हे आता चालणार नाही! आम्ही इथे फक्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नाही तर ही हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत."

"आपल्या लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी INDIA आघाडी कटीबद्ध आहे, कारण या देशातली सारी जनताच आमची ताकद आहे. देशाने दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली, पण देशाला प्रगतीपथावर नेण्यापेक्षा ह्या राजवटीने देशाला कित्येक दशकं मागे नेलं.... पण आता हीच वेळ आहे राष्ट्राने एकत्र येण्याची, साऱ्या जनतेने INDIA आघाडीसोबत ठाम उभं राहण्याची आणि देशाला उज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याची!" असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Aaditya Thackeray Slams BJP And Modi Government in Bharat jodo nyay yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.