वंचितकडून ८ उमेदवार जाहीर; आघाडीचे गूढ, नागपुरात काँग्रेसला दिला पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 06:23 IST2024-03-28T06:23:28+5:302024-03-28T06:23:56+5:30

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या आठ उमेदवारांची यादी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी जाहीर केली. मनोज जरांगे-पाटील व ओबीसी ...

8 candidates announced from Vanchit; Aghadi's mystery, support to Congress in Nagpur | वंचितकडून ८ उमेदवार जाहीर; आघाडीचे गूढ, नागपुरात काँग्रेसला दिला पाठिंबा 

वंचितकडून ८ उमेदवार जाहीर; आघाडीचे गूढ, नागपुरात काँग्रेसला दिला पाठिंबा 

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या आठ उमेदवारांची यादी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी जाहीर केली. मनोज जरांगे-पाटील व ओबीसी महासंघाचे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उमेदवार जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.

उर्वरित यादी २ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येईल. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत त्यांनी मविआतील सहभागाच्या चर्चेला पूर्णविराम दिला तरी काँग्रेससोबतच्या आघाडीचे गूढ मात्र, कायम ठेवले.  पहिल्या टप्प्यातील ‘वंचित’च्या उमेदवारांना जरांगे यांचे समर्थन आहे. याबाबत मंगळवारी त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

हे आहेत उमेदवार
अकाेला    ॲड. प्रकाश आंबेडकर 
भंडारा-गाेंदिया    संजय गजानंद केवट 
गडचिराेली-चिमूर    हितेश पांडुरंग मडावी 
चंद्रपूर    राजेश वारलुजी बेल्ले 
बुलढाणा    वसंत राजाराम मगर 
अमरावती    कुु. प्राजक्ता पिल्लेवान 
वर्धा    प्रा. राजेंद्र साळुंके 
यवतमाळ-वाशिम    सुभाष खेमसिंग पवार

Web Title: 8 candidates announced from Vanchit; Aghadi's mystery, support to Congress in Nagpur