प्रचारात आला कचरा अन् कचरापेट्या, मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजप नेत्यांमुळे सुरू झाले तुंबळ शाब्दिक युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 01:10 PM2024-03-31T13:10:46+5:302024-03-31T13:11:38+5:30

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये काही काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षांतर करणाऱ्या आपल्या नेत्यांवर टीका करताना काँग्रेसने 'कचरा,' 'कचऱ्याची पेटी' अशा शब्दांचा वापर केला.

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: Garbage and dustbins came in the campaign, Congress and BJP leaders started a war of words in Madhya Pradesh | प्रचारात आला कचरा अन् कचरापेट्या, मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजप नेत्यांमुळे सुरू झाले तुंबळ शाब्दिक युद्ध

प्रचारात आला कचरा अन् कचरापेट्या, मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजप नेत्यांमुळे सुरू झाले तुंबळ शाब्दिक युद्ध

भोपाळ - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये काही काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षांतर करणाऱ्या आपल्या नेत्यांवर टीका करताना काँग्रेसने 'कचरा,' 'कचऱ्याची पेटी' अशा शब्दांचा वापर केला. त्यावर सत्ताधारी भाजपनेही त्याच भाषेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांचे माध्यम सल्लागार तसेच काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी म्हटले होते की, भाजप म्हणजे कचऱ्याची पेटी झाला आहे. काँग्रेसमधील सगळा कचरा भाजप स्वतःकडे घेत आहे. काँग्रेसचे नेते सत्यनारायणन पटेल यांनी म्हटले होते की, काँग्रेसमधून निघून गेलेले नेते म्हणजे डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यासारखे आहेत. या उद्‌गारांबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, मोदी सरकारने दोन-तीन कचरापेट्या ठेवल्या होत्या. ओला व सुका कचरा, वैद्यकीय कचरा यासाठी त्या कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत.

अवमान केलेल्यांनी पक्ष सोडले : भाजप
मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या काही नेत्यांचा अवमान केला. तो सहन न झाल्याने या नेत्यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचा भाजपची धोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर विश्वास आहे.

Web Title: Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: Garbage and dustbins came in the campaign, Congress and BJP leaders started a war of words in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.