Crime: नणंदेला भेटून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, त्यानंतर हॉकी स्टिकनं..., पीडितेची मृत्युशी झुंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:39 IST2026-03-18T17:38:11+5:302026-03-18T17:39:04+5:30
Madya Pradesh Jabalpur Gangrape News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Crime: नणंदेला भेटून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, त्यानंतर हॉकी स्टिकनं..., पीडितेची मृत्युशी झुंज!
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचारानंतर नराधमांनी महिलेवर हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. जबलपूरमधील या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या नणंदेला भेटण्यासाठी भेदाघाट येथे गेली होती. तिथून परतत असताना अंधमुख बायपासजवळ एका कारमधून आलेल्या दोन आरोपींनी तिला पाहिले. तिला घरी सोडण्याचे खोटे आश्वासन देऊन या दोघांनी तिला कारमध्ये बसवले. कारमध्ये बसवल्यानंतर काही अंतरावर नेऊन या दोन्ही नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत तिच्या डोक्यावर हॉकी स्टिकने जोरदार प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी झाली.
VIDEO | Madhya Pradesh: Women allegedly gang raped in car; Jabalpur police arrest two men.
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2026
Suryakant Sharma, Additional SP, Jabalpur says, “A woman from the Tilwara police station area had gone to Bhedaghat to visit her sister-in-law. While returning, when she reached the… pic.twitter.com/WzEipSJSqA
कसातरी जीव वाचवून पीडितेने आपल्या भावाशी संपर्क साधला आणि तातडीने मझोली पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून जबलपूरचे अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा यांनी तात्काळ तपास पथके तयार केली. पोलिसांनी वेगाने हालचाली करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती जबलपूरचे वरिष्ठ पोलीस सूर्यकांत शर्मा यांनी दिली.