महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण
By राजकुमार जोंधळे | Updated: April 17, 2024 21:17 IST2024-04-17T21:16:35+5:302024-04-17T21:17:42+5:30
महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाच्या वतीने औराद येथे चेक पाेस्टची स्थापना करण्यात आली असून, येथे २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ये-जा करणाऱ्या सीसीटीव्हीची नजर असून, व्हीडिओ चित्रीकरणही केले जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनांची तपासणी, प्रत्येक वाहनांचे व्हीडिओ चित्रीकरण
लातूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक राज्याचे कलबुर्गी येथील सहआयुक्त बसवराज हडपड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाच्या वतीने औराद येथे चेक पाेस्टची स्थापना करण्यात आली असून, येथे २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ये-जा करणाऱ्या सीसीटीव्हीची नजर असून, व्हीडिओ चित्रीकरणही केले जात आहे.
लातूर जिल्ह्यातील लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलिस प्रशासन अलर्ट झाले असून, जिल्ह्यातील जिल्हा आणि राज्य सीमेवर तपासणी माेहीम राबविली जात आहे. औराद शहाजानी येथील महाराष्ट्र-कर्नाटक राज्य सीमेवर पाेलिसांनी चेकपाेस्ट स्थापन केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून अवैध दारूची वाहतूक हाेणार नाही, यासाठी येथे २४ तास वाहन तपासणी माेहीम राबविण्यात येत आहे. चेकपाेस्टवर तैनात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, त्यांना सूचना देण्यात येत आहेत. औराद शहजानी येथील चेकपाेस्टला कर्नाटक राज्याचे कलबुर्गी येथील सहआयुक्त बसवराज हडपड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उदगीर येथील निरीक्षक आर. एम. चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, चालक व्ही. व्ही. परळीकर यांच्यासह पोलिस दलातील कर्मचारी उपस्थित हाेते. शिवाय, औराद शहाजानी येथील ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक व्ही. के. दुरपडे, पी. आर. सूर्यवंशी, पी. के. काळे, व्ही. व्ही. नेकनाळे, एस. व्ही. राघो, आर. बी. बागवान, एम. बी. कोयले, शुभम पेटकर यांच्याकडून चेक पाेस्टवर ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.