Ichalkaranji Mayor: महापौर, उपमहापौर निवड बिनविरोधसाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:03 IST2026-02-06T18:59:45+5:302026-02-06T19:03:51+5:30

सोमवारी (दि.९) निवडणूक प्रक्रिया पार पडणार

Will discuss with opposition leaders for unopposed election of Ichalkaranji's mayor and deputy mayor says Chandrakant Patil | Ichalkaranji Mayor: महापौर, उपमहापौर निवड बिनविरोधसाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - चंद्रकांत पाटील

Ichalkaranji Mayor: महापौर, उपमहापौर निवड बिनविरोधसाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार - चंद्रकांत पाटील

इचलकरंजी : उदय आनंदा धातुंडे यांची महापौरपदी, तर अनिल देवकरण डाळ्या यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केली.

ही निवड बिनविरोध करण्यासाठी विरोधी शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. महापौर व उपमहापौर नावाची घोषणा करण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बॅँकेच्या मुख्य शाखेत नगरसेवकांची बैठक झाली. 

पहिलीच महापौराची निवड असल्याने ती बिनविरोध करण्यासाठी शिव-शाहू आघाडीचे नेते मदन कारंडे यांच्याशी आपण स्वत: चर्चा करणार आहे. यासंदर्भात आमदार सतेज पाटील यांना विनंतीही करण्यात आली आहे. बिनविरोध निवड केल्यास विकासकामांमध्ये शिव-शाहू आघाडीला झुकते माप देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत धातुंडे व डाळ्या यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी नगरसचिव राहुल पोटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. धातुंडे यांनी २ अर्ज दाखल केले असून, डाळ्या यांनी एक अर्ज दाखल केला आहे. संजय शिंदे या पिठासन अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.९) ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

Web Title : इचलकरंजी महापौर चुनाव: सर्वसम्मति से चयन के लिए बातचीत होगी।

Web Summary : चंद्रकांत पाटिल ने उदय धातुंडे और अनिल डाल्या को महापौर और उपमहापौर पद के लिए उम्मीदवार घोषित किया। उन्होंने शिव-शाहू गठबंधन के नेताओं के साथ सर्वसम्मत चुनाव पर चर्चा करने और विकास पर विचार करने का वादा किया। नामांकन दाखिल; चुनाव सोमवार को।

Web Title : Ichalkaranji Mayor Election: Talks to be held for unanimous selection.

Web Summary : Chandrakant Patil announced Uday Dhatunde and Anil Dalya as candidates for Mayor and Deputy Mayor, respectively. He will discuss unanimous election with Shiv-Shahu alliance leaders, promising development consideration. Nominations filed; election on Monday.