'वंचित'कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 17:48 IST2024-03-23T17:46:05+5:302024-03-23T17:48:24+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपातील तिढा ...

Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar announced his support to Shahu Maharaj in Kolhapur | 'वंचित'कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

'वंचित'कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपातील तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. 



दरम्यान, शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल, असे म्हटले आहे.


 
महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

Web Title: Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar announced his support to Shahu Maharaj in Kolhapur