Kolhapur: मतदान संपेपर्यंत कामात रहा, अमित शहांच्या उमेदवारांसह नेत्यांना सूचना

By समीर देशपांडे | Updated: May 3, 2024 12:48 IST2024-05-03T12:45:39+5:302024-05-03T12:48:29+5:30

दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला

Stay at work till the polls are over, advice to leaders including Amit Shah candidates | Kolhapur: मतदान संपेपर्यंत कामात रहा, अमित शहांच्या उमेदवारांसह नेत्यांना सूचना

Kolhapur: मतदान संपेपर्यंत कामात रहा, अमित शहांच्या उमेदवारांसह नेत्यांना सूचना

कोल्हापूर : जरी जाहीर प्रचार रविवारी संपत असला तरीही ७ मे रोजी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत कामात रहा. कोणत्याही परिस्थितीत सकाळी मतदान करवून घ्या अशा सूचना भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार आणि प्रमुख नेत्यांना दिले.

केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान अंबाबाईचे दर्शन घेतले आणि ते कोल्हापूरहून हुक्केरीकडे रवाना झाले. सकाळी दहानंतर शहा थांबलेल्या हॉटेलवर खासदार धनंजय महाडिक आले. महाडिक यांना शहा यांनी बोलावले. त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या उमेदवारांना बोलावून घेतले. यावेळी भाजप नेते समरजित घाटगे उपस्थित होते. या चौघांशीही शहा यांनी सविस्तर चर्चा करून सुचना केल्या. दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा परिणाम आणि नितीन गडकरी यांच्या दौऱ्याचीही त्यांनी माहिती घेतली.

Web Title: Stay at work till the polls are over, advice to leaders including Amit Shah candidates