कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

By समीर देशपांडे | Updated: April 24, 2024 13:12 IST2024-04-24T13:10:44+5:302024-04-24T13:12:08+5:30

किमान दोन लाख नागरिक सभेसाठी उपस्थित राहणार, महायुतीच्या नेत्यांची तयारीसाठी बैठक

Prime Minister Narendra Modi's meeting will be over in Kolhapur, Guardian Minister Hasan Mushrif expressed his belief | कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये शनिवारी (दि.२७) होणारी सभा अतिविराट होईल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेच्या पूर्वतयारीसाठी महायुतीच्या सर्व नेत्यांची येथे आज, बुधवारी सकाळी बैठक झाली. त्यानंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, किमान दोन लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठीचे नियोजन सुरू असून आम्ही सर्वजण ही सभा यशस्वी करू. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, नरेंद्र मोदी यांची ही सभा ऐतिहासिक होईल. आम्ही सर्वांनी यासाठी निर्धार केला असून तालुकावार नियोजन करण्यात येत आहे. 

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजित घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Prime Minister Narendra Modi's meeting will be over in Kolhapur, Guardian Minister Hasan Mushrif expressed his belief