पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा

By समीर देशपांडे | Updated: April 23, 2024 19:09 IST2024-04-23T19:08:40+5:302024-04-23T19:09:13+5:30

आधीच्या नियोजनानुसार ही सभा रविवारी होणार होती. ती आता शनिवारी होणार

Prime Minister Narendra Modi will hold a meeting at Tapovan Maidan in Kolhapur on Saturday | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या शनिवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजता येथील तपोवन मैदानावर होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. आधीच्या नियोजनानुसार ही सभा रविवारी होणार होती. ती आता शनिवारी होणार आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री आणि जिल्ह्यातील महायुतीचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

जिल्ह्यातील या दोन्ही ठिकाणी ‘मोदी फॅक्टर’ महत्वाचा ठरेल अशी महायुतीच्या नेत्यांची अटकळ आहे. त्यानुसार त्यांच्या सभेसाठी प्रयत्न सुरू होते. परंतू ही सभा कराड, साताऱ्याच्या सीमेवर घेतली जाईल असे सुरूवातीला सांगण्यात आले. परंतू आता नव्या नियोजनानुसार कोल्हापूर शहरातच ही सभा होणार असून याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi will hold a meeting at Tapovan Maidan in Kolhapur on Saturday