Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात उद्धवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:48 IST2026-01-16T20:46:38+5:302026-01-16T20:48:22+5:30
शिवाजी पेठ येथेही दगडफेकीची घटना

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात उद्धवसेनेच्या कार्यालयावर दगडफेक-video
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा आज, शुक्रवारी निकाल जाहीर झाला. महायुती, काँग्रेससह सर्वच पक्षाचे उमेदवार विजयी होताच समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. सर्वत्र गुलालाची उधळण सुरु असतानाच उद्धवसेनेच्या विभागीय कार्यालयावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेला केवळ एका जागेवर विजयी मिळवता आला आहे. तर शिंदेसेनेने १५ उमेदवार निवडून आले. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण सुरु असतानाच टाकाळा परिसरात उद्धवसेनेचे पदाधिकारी विशाल देवकुळे यांच्या संपर्क कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक करुन फलकाची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा
तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकारानंतर उद्धवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
शिवाजी पेठेत दगडफेक
दरम्यानच, शिवाजी पेठे परिसरात विरोधक आमने-सामने आले. कनाननगर आणि शिवाजी पेठेत दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. या घटनांमुळे घटनांमुळे तणाव वाढला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करीत जमाव पांगवला असला तरी तणाव कायम आहे.