कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले

By विश्वास पाटील | Published: May 1, 2024 07:51 AM2024-05-01T07:51:46+5:302024-05-01T15:18:33+5:30

शौमिका यांच्या भाषणाबद्दल लोकांतही उत्सुकता होती. त्यांनी राजकीय मांडणी केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदावरील नेत्याचा मुद्दा उपस्थित केला.

Kolhapur Lok Sabha Constituency - In a meeting of BJP leaders, the youth suddenly took Rahul Gandhi's name, the video went viral | कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले

कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले

कोल्हापूर : महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल येथे सोमवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत भलतीच गंमत झाली. पंतप्रधान म्हणून तुम्ही देश कुणाच्या हातात देणार, असा प्रश्न या सभेत केल्यावर व्यासपीठाजवळ थांबलेल्या एका तरुणाने चक्क राहुल गांधी असे म्हटल्याने व्यासपीठावरील नेत्यासह सभेला जमलेले लोकही हसून पडले. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तर गदागदा हसत होते.

घडले ते असे : खासदार मंडलिक यांच्यासाठी झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर पालकमंत्री मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, उमेदवार मंडलिक तसेच कागलच्या घाटगे घराण्यातील (ज्युनिअर सरकार) अखिलेशसिंह घाटगे व त्यांच्या बहीण शौमिका महाडिक प्रमुख उपस्थित होत्या. शौमिका यांच्या भाषणाबद्दल लोकांतही उत्सुकता होती. त्यांनी राजकीय मांडणी केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदावरील नेत्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्या म्हणाल्या, देशाचा पंतप्रधान कसा हवा याचा विचार आपण केला पाहिजे. भाजप सरकार आले तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नाव समोर आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीकडे या तोडीचा एकही नेता आज नाही. काँग्रेसकडे फार तर राहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी असू शकेल. पण मला सांगा, पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद मोदींच्या हातात..? या प्रश्नानंतर उत्तरासाठी त्या काही क्षण थांबल्या.

सभेत सर्वत्र शांतता असतानाच व्यासपीठाजवळ उभा असलेला एक जण म्हणाला, राहुल गांधी... त्यावर कुणीतरी त्या तरुणास कोण रे म्हणून फटकारलेही, परंतु सभेत मात्र एकच हशा पिकला. स्वत: शोमिका महाडिक यांनाही हसू आवरले नाही. भाषण थांबवून त्या हसत राहिल्या. तो कार्यकर्ताही गडबडला. चुकून नाव आले असे म्हणू लागला. नंतर उपस्थितांनी मोदी मोदी असा गजर केला. या घटनेचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावर त्या तरुणाच्या तोंडातून खरं तेच बाहेर पडल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या.
 

Web Title: Kolhapur Lok Sabha Constituency - In a meeting of BJP leaders, the youth suddenly took Rahul Gandhi's name, the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.