corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ४८ गावात यंदा एक गाव..एक गणपती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:48 AM2020-07-24T10:48:25+5:302020-07-24T10:51:28+5:30

गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर तालुक्यातील ९३ पैकी ४८ गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक गावातील गणेशोत्सव मंडळे या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

corona virus: One village in 48 villages of Gadhinglaj taluka..an Ganpati ..! | corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ४८ गावात यंदा एक गाव..एक गणपती..!

corona virus : गडहिंग्लज तालुक्यातील ४८ गावात यंदा एक गाव..एक गणपती..!

googlenewsNext
ठळक मुद्दे गडहिंग्लज तालुक्यातील ४८ गावात यंदा एक गाव..एक गणपती..!पोलिस दलाकडून जनजागृती मोहिम, ९३ पैकी ४८ गावांत झाले एकमत

राम मगदूम

गडहिंग्लज  : गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर तालुक्यातील ९३ पैकी ४८ गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक गावातील गणेशोत्सव मंडळे या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

१९९० च्या दशकात जिल्ह्यात सर्वप्रथम गणराया अ‍ॅवॉर्ड आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेची सुरूवात गडहिंग्लज तालुक्यातूनच झाली. त्यामुळे गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच प्रबोधनपर देखावे साकारण्यात चढाओढ सुरू झाली.
गेल्या २५ वर्षांपासून तालुक्यातील निम्या गावात हा उपक्रम राबविला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित गावातदेखील हा उपक्रम राबविला जावा, यासाठी गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सपोनि दिनेश काशीद व नेसरीचे सपोनि अविनाश माने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व मंडळांचे पदाधिकारी धडपडत आहेत.

 या गावांचा झाला निर्णय

नेसरी, हलकर्णी, नूल, इंचनाळ, गिजवणे, तेगिनहाळ, तुप्पूरवाडी, नौकुड, चन्नेकुप्पी, अत्याळ, बेकनाळ, हसूरसासगिरी, ऐनापूर, इदरगुच्ची, माद्याळ, हनिमनाळ, हरळी बुद्रूक, चिंचेवाडी, मनवाड, हसूरवाडी, तनवडी, हणमंतवाडी, चंदनकूड, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, जखेवाडी, अरळगुंडी, वैरागवाडी, बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, लिंगनूर तर्फ नेसरी, मुंगूरवाडी, दुगूनवाडी, मासेवाडी, जांभूळवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, सांबरे, कुमरी, यमेहट्टी, सरोळी, अर्जूनवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, तारेवाडी, डोणेवाडी, हेळेवाडी, तावरेवाडी.

गणेशोत्सव मंडळांची संख्या

  • गडहिंग्लज ग्रामीण -२१५
  • गडहिंग्लज शहर - ३९


 गडहिंग्लजमधून सुरूवात

गडहिंग्लजचे तत्कालीन सपोनि दिलीप कदम यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम गडहिंग्लज तालुक्यात गणराया अ‍ॅवॉर्ड आणि एक गाव..एक गणपती हा उपक्रम सुरू केला. त्यावेळी बक्षीस वितरणासाठी आलेले तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख भगवानराव मोरे व माधव सानप यांना ही संकल्पना आवडली. त्यानंतर सानप यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबविला.

गडहिंग्लज शहराकडे लक्ष

१९५६ मध्ये स्थापन झालेले काळभैरव गणेशोत्सव मंडळ हे गडहिंग्लज शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ असून आज शहरात ३९ मंडळे आहेत. डॉल्बीमुक्तीनंतर पुरोगामी गडहिंग्लज शहरात कोरोनाला हरवण्यासाठी यावर्षी एकच गणपती बसविण्यासाठी मंडळांच्या हालचाली सुरू आहेत. खिलाडूवृत्तीने विधायक वाटचाल करणारी मंडळे या उपक्रमालाही नक्कीच प्रतिसाद देतील, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

 

Web Title: corona virus: One village in 48 villages of Gadhinglaj taluka..an Ganpati ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.