कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:24 IST2026-01-20T12:22:14+5:302026-01-20T12:24:29+5:30

कमालीचा सस्पेन्स वाढवला

Congress-Shinde Sena to come together in Kolhapur Municipal Corporation Suspense increased with MLA Satej Patil's statement | कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत महापौरपदावरून शिंदेसेना-भाजपचे बिनसले तर शिंदेसेना काँग्रेसबरोबर येईल का? या प्रश्नावर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बंददाराआडची चर्चा जाहीर करता येणार नाही, असे सांगत कमालीचा सस्पेन्स वाढवला. साेमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडली

महापालिकेत भाजप-शिंदेसेनेत महापौरपदावरून मतभेद झाले, शिंदेसेनेला महापौरपद नाही दिलं तर काँग्रेस शिंदेसेनेला सोबत घेणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर करता येणार नाही. जर तर च्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. या स्थितीत त्यावर बोलू शकत नाही. अजून गॅझेट निघायचे आहे, महापौरपदाचे आरक्षण जाहीर व्हायचे आहे. त्यात काय होतेय, हे पाहून त्यावर पुढील गोष्टी ठरतील.

Web Title : कोल्हापुर में कांग्रेस-शिंदे सेना गठबंधन? पाटिल ने सस्पेंस बरकरार रखा।

Web Summary : कोल्हापुर नगर निगम में शिंदे सेना के साथ संभावित गठबंधन पर सतेज पाटिल के बयान से सस्पेंस पैदा हो गया है। उन्होंने महापौर चुनाव और आरक्षणों के बारे में चल रही अनिश्चितताओं का हवाला देते हुए बंद दरवाजों की चर्चाओं का खुलासा करने से इनकार कर दिया।

Web Title : Congress-Shinde Sena alliance in Kolhapur? Patil keeps suspense alive.

Web Summary : Satej Patil's statement about potential alliance with Shinde Sena in Kolhapur Municipal Corporation creates suspense. He declined to reveal closed-door discussions, citing ongoing uncertainties regarding mayoral elections and reservations.