१० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

By मुरलीधर भवार | Updated: April 27, 2024 21:19 IST2024-04-27T21:19:02+5:302024-04-27T21:19:39+5:30

देशात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी जाहिर सभा घेत आहे.

pm narendra modi campaign rally in kalyan on may 10 | १० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

१० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांकरीता येत्या १० मे राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर प्रचार सभा होणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी दिली आहे.

खासदार पाटील यांनी सांगितले की, देशात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी जाहिर सभा घेत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. हा झंझावाद कल्याणमध्येही पाहावयास मिळणार आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणच्या फडके मैदानात जाहिर सभा पार पडली होती.

Web Title: pm narendra modi campaign rally in kalyan on may 10