'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 19:52 IST2024-04-04T19:50:42+5:302024-04-04T19:52:53+5:30

महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेतर्फे वैशाली दरेकर यांची कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर खासदार शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली

No matter who the candidate is, the election will be fought like an election Shrikant Shinde | 'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका

'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका

कल्याण- प्रत्येक पक्ष उमेदवार उभा करतो. त्याप्रमाणे विरोधकांनी उमेदवार उभा केला आहे. उमेदवार कोणी असला तरी निवडणूक निवडणुकीसारखी लढणार असल्याची प्रतिक्रिया कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेतर्फे वैशाली दरेकर यांची कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर खासदार शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे सेनेकडून तुमच्या नावाची घोषणा कधी होणार अशी विचारणा केली असता त्यांनी त्या प्रश्नावर केवळ स्मितहास्य करुन वेळ मारुन नेली आहे. खासदार शिंदे म्हणाले की, १० वर्षात केलेली विकासकामे जनतेसमोर आहेत ,विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार आहोत .जनता महायुतीला मतदान करणार. मागच्या वेळी पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण ग्रामीणमधील शुभारंभ सभागृहात शिंदेसेनेची एक बैठख पार पडली. या बैठकीस शिंदेसेनेचे पदादिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्याशी खासदार शिंदे यांनी संवाद साधला. त्या पश्चात त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: No matter who the candidate is, the election will be fought like an election Shrikant Shinde