शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:37 IST2026-01-21T13:14:08+5:302026-01-21T13:37:09+5:30

शिवसेना-भाजपा-मनसे एकत्रित येऊन महायुती सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांचे स्वागत आहे असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

MNS supports Eknath Shinde Shiv Sena in Kalyan Dombivali Municipal Corporation: Will it keep BJP away in power formation? | शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत

शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना-भाजपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली असली तरी निकालानंतर याठिकाणचे चित्र बदलले आहे. कल्याणमध्ये शिंदेसेनेचे ५३ आणि भाजपाचे ५० नगरसेवक निवडून आलेत. मात्र याठिकाणी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना मनसे आणि ठाकरेंच्या काही नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात उद्धव ठाकरेंकडील ११ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी २ नगरसेवक मनसेच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यात आज कोकण भवन येथे मनसेचे नेते राजू पाटील ७ नगरसेवकांसह गट नोंदणी करायला पोहचले. त्यानंतर काही वेळात याठिकाणी शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के त्यांच्या ५३ नगरसेवकांसह पोहचले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिंदेसेना-मनसे एकत्र सत्ता स्थापन करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, आज ५३ नगरसेवकांसह आम्ही गट नोंदणी करायला आलोय. कल्याण डोंबिवलीत महायुतीसोबत मनसे आल्याने आमची ताकद वाढली आहे. याठिकाणी शिवसेना-भाजपा-मनसे एकत्रित येऊन महायुती सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांचे स्वागत आहे. ठाकरे सेनेने पाठिंबा दिला तरीही त्यांचे स्वागत आहे. उल्हासनगरमध्येही वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. तिथे जो मॅजिक फिगर आहे तो शिवसेनेने पार केला आहे. महाराष्ट्रात महायुती म्हणून निवडणूक लढलो तिथे महायुतीचा महापौर बसेल असं त्यांनी सांगितले.

माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेचे आणि महापौर पदाची सूत्रे ठरली आहेत. त्यानंतर आज कोकण भवनात कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक दाखल झाले. त्यात शिंदेसेनेचे ५३, मनसेचे ५ अशी एकत्रित आघाडी होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त कार्यालयात श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, राजू पाटील यांचा एकत्रित फोटो समोर आला. मनसे शिंदसेनेला महापौर आणि सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणार आहे. त्याशिवाय जे ठाकरेंचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल आहेत तेदेखील या सत्ता स्थापनेच्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेने एकत्रित येत निवडणूक लढवली. त्यात भाजपाला ५० आणि शिंदेसेनेला ५३ जागांवर विजय मिळाला. भलेही महायुतीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तरीही महापौरपदावरून शिंदेसेनेने मनसेचा पाठिंबा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. मंगळवारच्या बैठकीनंतर राजू पाटील यांची आज कोकण आयुक्तांच्या कार्यालयात श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या गट नोंदणीचे काम सुरू आहे. या एकंदर घडामोडीमुळे कल्याण डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. 

Web Title : कल्याण डोंबिवली में शिंदे सेना ने मनसे से समर्थन मांगा, भाजपा को किया किनारे?

Web Summary : कल्याण-डोंबिवली में शिंदे सेना ने मनसे से समर्थन मांगा, जिससे भाजपा सत्ता से बाहर हो सकती है। संयुक्त चुनाव के बाद बातचीत जारी है। ठाकरे गुट के कुछ पार्षद भी शामिल हो सकते हैं। महापौर पद के लिए शिंदे सेना और मनसे के बीच गठबंधन की अटकलें।

Web Title : Shinde Sena seeks MNS support in Kalyan Dombivli, sidelining BJP?

Web Summary : Shinde Sena eyes MNS support in Kalyan-Dombivli, potentially excluding BJP from power. Talks ongoing after joint elections. Some Thackeray faction corporators may also join. A coalition between Shinde Sena and MNS is speculated for mayor position.