उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश
By मुरलीधर भवार | Updated: April 12, 2024 18:19 IST2024-04-12T18:16:53+5:302024-04-12T18:19:32+5:30
कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत

उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश
कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या उभ्या ठाकल्या आहेत. मात्र उद्धवसेनेचे उप विभाग प्रमुख विजय फुलोरे यांनी आज शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
हा प्रवेश शिंदे सेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आला. या प्रसंगी तालुका प्रमुख चैनू जाधव हे देखील उपस्थित होते. विजय फुलोरे हे कल्याणमधील माणेरे गावचे काम पाहत होते. त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे या भागात शिंदे सेनेेची ताकद वाढणार असल्याचा दावा शहर प्रमुख गायकवाड यांनी केला आहे.