कल्याण लोकसभेतून भाजपाचा कार्यकर्ता अपक्ष लढवणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:39 IST2024-03-31T16:37:21+5:302024-03-31T16:39:27+5:30
Lok Sabha Election 2024 : राकेश जैन असं या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

कल्याण लोकसभेतून भाजपाचा कार्यकर्ता अपक्ष लढवणार निवडणूक
कल्याण लोकसभा मतदारसंघाभोवती आधीच राजकीय पिंगा सुरू असताना आता आणखी एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. भाजपाच्या एका कार्यकर्त्याने आपण या लोकसभेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे या सीटबाबत भाजप आग्रही आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राकेश जैन असं या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. जैन यांचं म्हणणं आहे की, हा मतदारसंघ पारंपरिकरित्या भाजपाचा आहे. त्याचप्रमाणे त्यांना सर्व समाजाचा पाठींबा असून इथून पुढेही कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
जैन यांनी कल्याण हा पारंपरिक रित्या भाजपाचा मतदारसंघ असल्याचा उल्लेख केल्याने जर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला दिला तर भाजपा इथे कशाप्रकारे व्यक्त होईल असा एक प्रकारे इशाराच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही..या मतदारसंघावरून सेना भाजपमध्ये सुरवातीपासूनच रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता नवनवीन राजकीय ट्विस्ट समोर येत आहे.
कल्याण लोकसभेतून भाजपाचा कार्यकर्ता अपक्ष लढवणार निवडणूक #LokSabhaElection2024#politics#BJPpic.twitter.com/O6V9EhQfVM
— Lokmat (@lokmat) March 31, 2024