उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील -प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:07 IST2024-05-03T15:55:28+5:302024-05-03T16:07:52+5:30

पाचोरा येथे शुक्रवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते.

Uddhav Thackeray will join hands with BJP anytime - Prakash Ambedkar | उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील -प्रकाश आंबेडकर 

उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील -प्रकाश आंबेडकर 

- श्यामकांत सराफ

पाचोरा (जि. जळगाव) :  महाविकास आघाडीतील नेते जातीयवादी आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत.  मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील, असेही ते म्हणाले. 

पाचोरा येथे शुक्रवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी ‘वंचित’ तयार होते.  मात्र उद्धवसेना,  काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष हेकेखोरपणा दाखवून वंचितला कमी लेखत होते,  म्हणून आपण महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. 
 
उद्धव ठाकरे ही मोदींविषयी स्पष्ट बोलत नाहीत,  त्यांचे खासदार सभागृहात असतानाही केंद्राने केलेल्या गैरकारभाराची माहिती बाहेर का काढत नाहीत?   असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Uddhav Thackeray will join hands with BJP anytime - Prakash Ambedkar