१ लाखासाठी भारतीयाची अमेरिकेत हत्या; अब्दुलचा मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 05:26 IST2024-04-10T05:25:22+5:302024-04-10T05:26:15+5:30

मोहम्मद हा हैदराबाद येथील आहे. तो आयटी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता.

Murder of an Indian in America for 1 lakh; Abdul's body was found | १ लाखासाठी भारतीयाची अमेरिकेत हत्या; अब्दुलचा मृतदेह आढळला

१ लाखासाठी भारतीयाची अमेरिकेत हत्या; अब्दुलचा मृतदेह आढळला

न्यूयॉर्क : अमेरिकेत गेल्या महिन्यापासून बेपत्ता असलेला मोहम्मद अब्दुल अरफात (वय २५) या भारतीय विद्यार्थ्याचा क्लिव्हलँड या शहरात मृतदेह आढळून आला. गेल्या आठवडाभरात अमेरिकेत भारतीयाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात ओहायो येथे उमा सत्यसाई गड्डे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर गेल्या महिन्यात नर्तक अमरनाथ घोष याची मिसुरीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.  

मोहम्मद हा हैदराबाद येथील आहे. तो आयटी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता. मोहम्मदचे अपहरण करण्यात आले असून, १२०० डॉलरची खंडणी दिल्यास त्याची मुक्तता केली जाईल अशी धमकी देणारा दूरध्वनी अज्ञात व्यक्तीने केला होता असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्याची किडनी विकण्याची धमकीही कुुटुंबीयांना देण्यात आली होती, असे मोहम्मदच्या वडिलांनी म्हटले होते. 

Web Title: Murder of an Indian in America for 1 lakh; Abdul's body was found