नेहमीप्रमाणे फोर्ब्ज मॅगझिनने नुकतेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी (2020) जाहीर केली आहे. या यादीत सर्वात आश्चर्यचकित करणारं नाव म्हणजे काइली जेनर, यात अमेरिकन टीव्ही स्टार काइली जेनरने बाजी मारली आहे. तेव्हापासून पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. या यादीनुसार काइलीने 2020 या वर्षात 590 मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. 


काइली तिच्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे.काइली जेनर 'काइली कॉस्मेटिक्स' नावाच्या कंपपनीची ओनर आहे. तिने तीन वर्षांआधी म्हणजे २०१६ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. सध्या या कंपनीची व्हॅल्यू ९० कोटी डॉलर(६४ अरब रूपये) इतकी असल्याचं सांगितली जाते. काइलीचे ब्यूटी प्रॉडक्ट वापरणाऱ्यांमध्ये श्रींमत लोकांचा भरना जास्त आहे.


याआधी काइली जगातल्या सर्वात कमी वयाच्या श्रीमंत महिलांच्या यादीत जागा मिळाली होती. त्यावेळी तिला फोर्ब्स मॅगझिनच्या कव्हर पेजवरही जागा मिळाली होती.काइलीने २०१७ मध्ये ट्रेविस स्कॉट याच्यासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.

काइली इन्स्टाग्रामवरही चांगलीच लोकप्रिय आहे. तिला इन्स्टाग्रामवर १२ कोटींपेक्षा अधिक लोक फॉलो करतात. कायलीचे बिकिनीतील फोटो अनेकवेळा चर्चेत आले आहेत. तिचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरतात.


काइली जेव्हा २० वर्षांची होती तेव्हा ती लग्नाआधीच एका मुलीची आई झाली होती. २०१८ साली तिने स्टोर्मीला जन्म दिला होता.२०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रैविस स्कॉटसोबत ती जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ती वेगळी झाली होती. काइली जेनर किम कार्दशियनची सावत्र बहिण आहे.

काइलीही फिटनेस फ्रिक आहे विशेषतः ती  आपल्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. या फिगरला मेन्टेन ठेवण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएबाबतही फार कॉन्शिअस असते. तिच्या फिगरवर अनेक तरूणांप्रमाणे तरूणीही फिदा असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: TV star Kylie Jenner has been crowned the highest-paid celebrity of 2020 by Forbes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.