Tom Cruise all set to ride made-in-India BMW for his next Mission Impossible 7 | जे बात! 'मिशन इम्‍पॉसिबल' मध्ये मेड इन इंडिया बाइक चालवणार टॉम क्रूज, शूटचा व्हिडीओ व्हायरल....

जे बात! 'मिशन इम्‍पॉसिबल' मध्ये मेड इन इंडिया बाइक चालवणार टॉम क्रूज, शूटचा व्हिडीओ व्हायरल....

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज सध्या 'मिशन इम्पॉसिबल' फ्रॅन्चायजीच्या ७व्या सिनेमाचं शूटींग करत आहे. त्याचे जगभरातील फॅन्स हा अ‍ॅक्शनने भरपूर सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत की, या सिनेमात टॉम क्रूज कोणत्या बाइक्स आणि कार्सचा वापर करणार आहे. 

याचं कारण म्हणजे टॉम क्रूजच्या 'मिशन इम्पॉसिबल' सीरीजमध्ये नेहमीच जबरदस्त सीक्वेन्सेस आणि बाइक्स स्टंट बघायला मिळतात. आता नव्या सीरीजमध्ये सर्वात जास्त खास ठरणारी बाब म्हणजे या सिनेमात बॉडी डबलऐवजी टॉम क्रूज स्वत: काही अ‍ॅक्शन सीन शूट करणार आहे. 

मेड इन इंडिया बाइक चालवताना दिसला टॉम

आता माहिती मिळाली आहे की, अमेरिकन अभिनेता टॉम क्रूज या सिनेमात मेड इन इंडिया बाइकवर राइड करताना दिसणार आहे. नुकतंच त्याला इटलीमध्ये शूटींग करताना BMW G 310 GS ही बाइक चालवताना बघण्यात आलं. G 310 GS ही बाइक भारत आणि इतर इंटरनॅशनल मार्केटसाठी होसुर येथील टीव्हीएस प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चर केली जाते.

इटालियन पोलिसही वापरतात ही बाइक

MI7 मध्ये टॉम क्रूज जी बाइक वापरताना दिसला ती बाइक इटालियन पोलीस पेट्रोलिंगसाठी वापरतात. या वेगळी कलर स्कीम, अलर्ट लाइट्स आणि साइड पॅनिअर्स असतात.

कंपनीने लॉन्च केलं नवं BS6 मॉडल

टॉम या सिनेमात G 310 GS चं BS4 मॉडल चालवताना दिसत आहे. तर नुकतं जर्मन मोटारसायकल मेकरने भारतात BS6 मॉडल लॉन्च केलं आहे.  या नव्या बाइकमध्ये नवीन LED हेडलॅम्प क्लस्टर देण्यात आले आहे. तसेच ही बाइक नव्या वेगवेगळ्या रंगातही उपलब्ध आहे. यात ३१३ सीसीचं लिक्विड कूल इंजिन देण्यात आलं आहे जे ३४ बीएचपी आणि २८ एनएमचा पीक टार्क जनरेट करतं.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tom Cruise all set to ride made-in-India BMW for his next Mission Impossible 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.