'Supergirl' actor Olivia Nikkanen tests positive for corona virus PSC | हॉलिवूडमधील या सुंदर अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

हॉलिवूडमधील या सुंदर अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

ठळक मुद्देओलवियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याद्वारे सांगितले आहे की, मला सुरुवातीला प्रचंड ताप होता. तसेच अंग देखील दुखत होते. सध्या यावर उपचार सुरू असून माझी तब्येत आता पहिल्यापेक्षा बरी आहे.

कोराना व्हायरसने हजारोंचे बळी घेतले. लाखो लोकांना ग्रासले. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत कुणीही यातून सुटलेले नाही. हॉलिवूडमध्येकोरोनाने ग्रासले आहे. काही दिवासांपूर्वी हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर ‘जेम्स बॉन्ड’ची अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्को आणि ब्रिटीश अभिनेता इडरिस एल्बा यालाही कोरोनाची लागण झाली होती. आता ओलविया निकेंननचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

शो द सोसायटी आणि सुपरगर्ल मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री ओलविया निकेंननला कोरोनाची लागण झाली असून तिने नुकतीच कोरोनाची चाचणी केली होती. ओलविया ही २१ वर्षांची असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ओलवियाने इन्स्टाग्रामद्वारे याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली असून तिच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचे देखील तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. 

ओलवियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याद्वारे सांगितले आहे की, मला सुरुवातीला प्रचंड ताप होता. तसेच अंग देखील दुखत होते. सध्या यावर उपचार सुरू असून माझी तब्येत आता पहिल्यापेक्षा बरी आहे. पण मला पूर्णपणे बरे वाटायला काही दिवस तरी जातील. माझ्यात १३ मार्चपासून कोरोनाची लक्षणं दिसायला सुरुवात झाली होती. त्यामुळे माझी आई माझ्यापासून पूर्णपणे वेगळी राहात असून ती एकदम व्यवस्थित आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे.  

Web Title: 'Supergirl' actor Olivia Nikkanen tests positive for corona virus PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.