रिएलिटी टेलिव्हिजन स्टार व्हिटनी पोर्टने धक्कादायक खुलासा केला आहे. हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रिओनं व्हिटनीला वन नाईट स्टॅण्डसाठी विचारलं होतं. मात्र त्यावेळी तिनं लिओनार्डोला नकार दिला होता. विशेष म्हणजे आता व्हिटनीला या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे. व्हिटनीचं आता लग्न झालं असून तिला दोन वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र लिओनार्दोला नकार दिल्याचा पश्चाताप आजही तिला होत असल्याचं तिने सांगितलं.


 यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार,  व्हिटनी पोर्टनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की, २००९ मध्ये हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रिओने मला वन नाईट स्टॅण्डसाठी विचारलं होती. मात्र त्यावेळी मी त्याला नकार दिला होता. त्यावेळी मला लिओनार्डोसोबत एकटीला रहायचं नव्हतं. मी प्रचंड नर्व्हस झाले होते. कारण यापूर्वी मी कधीच असं केलं नव्हतं, त्यामुळे मी खूप अनकम्फर्टेबल होते. याच कारणास्तव मी त्याला नकार दिला आणि ही संधी मी गमावली. त्याला नकार दिल्यामुळे मला आयुष्यभर याचा पश्चाताप करावा लागेल.


पुढे तिने सांगितले की, एका पार्टीत माझी लिओनार्डोसोबत ओळख झाली होती. यावेळी आम्ही आमचे कॉन्टॅक्ट नंबरदेखील एकमेकांना शेअर केले होते. या ओळखीनंतर आमच्यात चांगली मैत्री झाली आणि त्याने मला डेटसाठी विचारलं. त्यावेळी मी नकार दिला होता.

ही गोष्ट मला कित्येक वर्षांपासून कोणालातरी सांगायची होती. मात्र माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून कोणालाच काही सांगितलं नाही. खरं तर आता ही गोष्ट त्याच्याही लक्षात नसेल.

व्हिटनी टीम रोजमॅनसोबत लग्नबेडीत अडकली असून तिला २ वर्षांचा मुलगा आहे. तर लिओनार्डो सध्या कॅमिला मूरला डेट करतो आहे.

Web Title: Shocking ...! Whitney Port Will Always Have Her Regrets About Leonardo DiCaprio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.