ब्रिटीश टेलिव्हिजन स्टार व माजी रग्बी खेळाडूने शालेय जीवनात त्याच्याच मित्राचा एका मुलीसोबतचा सेक्स व्हिडिओ बनविला होता. त्यानंतर हा व्हिडिओ शाळेतील इतर मित्रांना देखील दाखवला होता. हा स्टार म्हणजे जेम्स हस्केल. हा खुलासा ब्रिटीश मीडियाने केला आहे. त्याच्या खुलासामुळे चाहत्यांना खूप मोठा झटका लागू शकतो. 

जेम्स हस्केलनं त्याच्या शालेज जीवनातील एक खळबळजनक खुलासा केला आहे आणि त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

आज तकच्या रिपोर्टनुसार, नुकत्याच एका टीव्ही शोमध्ये हस्केलनं त्याच्या शालेय जीवनातील एक धक्कादायक आठवण सांगितली. या मुलाखतीत त्याने तो १८ वर्षांचा असताना माझ्या खास मित्राचा त्याच्या १७ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत शाळेत सेक्स करतानाचा व्हिडिओ नकळत बनवला होता असा खळबळजनक खुलासा केला होता. जेम्स हस्केलने 'आय एम अ सेलिब्रेटी' या शोमध्ये हा किस्सा सांगितला. हे ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला.


हस्केलची ही बातमी सर्वात आधी mirror.co.ukने दिली. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, जेम्स हस्केलने शाळेत असताना असे भयंकर कृत्य केले होते. शाळेत असताना त्यानं आपल्या मित्राचा लपून सेक्स करतानाच व्हिडीओ काढला होता. यावेळी आपला कोणीतरी गुप्तपणे व्हिडिओ काढत आहे याची त्या मुलीला कल्पना देखील नव्हती. इतकेच नाही तर जेम्सने हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही दाखवला होता. जेव्हा ही गोष्ट त्या मुलीला कळली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.


२००३ मध्ये शाळेत ही गोष्ट समजल्यानंतर या तिघांनाही शाळेने निलंबित केले होते. या सर्वांचा उल्लेख त्याने 'आय एम अ सेलिब्रेटी' या कार्यक्रमात केला आहे.

Web Title: Shocking! british actor james haskell made sex video in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.