नव्वदच्या दशकात गाजलेली हॉलिवूड टेलिव्हिजन सीरिज बॉय मीट्स वर्ल्डमध्ये काम केलेली अभिनेत्री मॅटलेंड वार्डबद्दल धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन अभिनेत्री मॅटलेंड वार्डने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरूवात केली आहे. ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये मॅटलेंडला रिशेल मॅक्गवायर नावाने ओळखली जाते. मॅटलेंड वार्डनेही एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. सध्या ती ड्राइव या पौढ सिनेमाच्या निर्मितीत बिझी आहे.

मॅटलेंड वार्डने तिच्या सिनेइंडस्ट्रीत करियरची सुरुवात १९९४ मध्ये बोल्ड अँड ब्यूटीफुल या मालिकेतून केली होती. त्यावेळी मॅटलेंड वार्ड फक्त १६ वर्षांची होती. यानंतर वार्डने यूएसए हाय, रूल्स ऑफ एन्गेजमेन्ट आणि होम इम्प्रूवमेन्टच्या सातव्या सीझनमध्ये काम केले होते. मॅटलेंड वार्डने १९९७ मध्ये मारियो लोपेजसोबत किलिंग मिस्टर ग्रिफिन या चित्रपटातही काम केले होते.


१९९८ साली सर्वात लोकप्रिय मालिका बॉय मीट्स वर्ल्डमध्ये मॅटलेंड मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने २००० सालापर्यंत काम केले. २००४ साली तिने कॉमेडी शो व्हाइट चिक्समध्येही काम केले.


मॅटलेंड वार्डने एका मुलाखतीत पॉर्न इंडस्ट्रीत जाण्याच्या निर्णयाबद्दल सांगताना म्हणाली की, जेव्हा तिने पहिल्यांदा एडल्ट सिनेमात काम केले होते. त्यावेळी तिला स्वतःची भूमिका खूप चॅलेंजिंग वाटली होती. सिनेमाची कथा वाचल्यानंतर तिने सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला होता.

वार्डच्या मते, तिची भूमिका फार सुंदर लिहिण्यात आली होती. मॅटलेंड वार्डनुसार, तिच्या पॉर्न करिअरची सुरुवात कोजप्लेने झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking ...! 'Boy Meets World' star Maitland Ward doing porn: 'I felt ready'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.