हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नाया रिवेराबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅलिफोर्नियातीली वेंचुरा काउंटीमधील पीरू सरोवरात बुडाल्याचे समजते आहे. ती तिच्या चार वर्षांच्या मुलासोबत स्विमिंग करण्यासाठी गेली होती पण ती पाण्यातून परत आली नाही. ही माहिती वेंचुरा काउंटीमधील शेरिफ विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

नाया रिवेराबाबत शेरिफ विभागाने ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले की, पीरू सरोवरात बुडालेल्या व्यक्तीचा शोथ सुरू आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये विभागाने सांगितले की, हरवलेली व्यक्ती 33 वर्षीय नाया रिवेरा आहे आणि तिचा शोध सुरू आहे. नाया रिवेराचा सरोवरात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध सुरू आहे.

तर पोलिसांनी स्टेटमेंट दिले की नाया रिवेरा आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत भाड्याने घेतलेली बोट घेऊन स्विमिंगसाठी गेली होती. खूप वेळ झाली ती बोट घेऊन परतली नाही त्यामुळे पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर नाया रिवेरा हरवली होती पण तिचा चार वर्षांचा मुलगा बोटीत होता.

नाया रिवेराच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याची आई स्विमिंग करण्यासाठी पाण्यात उडी मारली पण ती परत आली नाही. सध्या पोलीस तिला शोधत आहेत. पण पोलीस बुडून तिचा मृत्यू झाला असेल, असे मानत आहेत. 

नाया रिवेराने हॉलिवूडमधील बऱ्याच चांगल्या सिनेमात काम केले आहे.

ती म्युझिक सीरिज ग्लीमुळे जास्त लोकप्रिय झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! The actress who went for a swim in the lake went missing, only a four-year-old boy was found in the boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.