काय राव? DDLJ च्या ‘मेहंदी लगा ...’चं इंग्लिश व्हर्जन अजून नाही ऐकलं? प्रियंकालाही आवरलं नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 01:34 PM2021-07-30T13:34:22+5:302021-07-30T13:35:14+5:30

होय, ‘मेहंदी लगा के रखना’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. आता हे गाणं पुन्हा चर्चेत आहेत. अर्थात एका नव्या ट्विस्टसह.

priyanka chopra reaction on english version of mehndi laga ke rakhna by jay sean | काय राव? DDLJ च्या ‘मेहंदी लगा ...’चं इंग्लिश व्हर्जन अजून नाही ऐकलं? प्रियंकालाही आवरलं नाही हसू

काय राव? DDLJ च्या ‘मेहंदी लगा ...’चं इंग्लिश व्हर्जन अजून नाही ऐकलं? प्रियंकालाही आवरलं नाही हसू

Next
ठळक मुद्देजे शॉन व प्रियंका चोप्रा हे दोघेही चांगले मित्र आहेत. जे शॉनने वयाच्या 12 व्या वर्षापासूनच रॅप व पॉप गायला सुरूवात केली होती.

‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ या सुपरडुपर हिट सिनेमाचं एक गाणं सध्या जाम चर्चेत आहे. होय, ‘मेहंदी लगा के रखना’ हे काजोल (Kajol) व शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांच्यावर चित्रीत गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. आता हे गाणं पुन्हा चर्चेत आहेत. अर्थात एका नव्या ट्विस्टसह. होय, भारतीय वंशाचा ब्रिटीश रॅपर, सिंगर जे शॉननं (Jay Sean) या गाण्याला असा काही ट्विस्ट दिलायं की, त्याचं हे गाणं ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अगदी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra ) हिलाही तिचं हसू आवरता आलं नाही.
जे शॉन हा बॉलिवूडच्या गाण्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. आता त्यानं ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’  या चित्रपटातील ‘मेहंदी लगा के रखना’ ला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले आहे. ओरिजनल ट्युनसोबतचं हे इंग्लिश गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतंय.

‘मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना ’ याचं थेट ‘एप्लाई हिना ऑन योर हैंड्स, डेकोरेट योर डोली. टू टेक अवे ह्यओ ब्यूटीफुल... योर लवर विल कम...’, असं इंग्लिशमधील भाषांतर ऐकणं एक भन्नाट अनुभव आहे.

जे शॉनच्या या भन्नाट गाण्यावर कमेंट्सचा जणू पूर आला आहे. हे गाणं ऐकून प्रियंका चोप्रालाही हसू आवरता आले नाही. हाहाहाहा.., अशी कमेंट तिनं केली. लोकांनीही एकापेक्षा एक भारी कमेंट करत या गाण्याची मजा घेतली.
जे शॉन व प्रियंका चोप्रा हे दोघेही चांगले मित्र आहेत. जे शॉनने वयाच्या 12 व्या वर्षापासूनच रॅप व पॉप गायला सुरूवात केली होती. शिक्षण अर्धवट सोडून तो गायनात रमला. आज जे शॉनचे जगभर चाहते आहेत. बॉलिवूडच्या काही सिनेमात त्यानं कामही केलं आहे.

Web Title: priyanka chopra reaction on english version of mehndi laga ke rakhna by jay sean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app