सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे. ते ही तिच्या चौथ्या लग्नामुळे. बे वॉच गर्ल कॅनडियन मॉडेल, अभिनेत्री पॅमेला अँडरसनने आपल्या बॉडीगार्डसोबतच लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. यापूर्वी पामेलाचे तीन लग्न झालीत मात्र काही ना काही कारणामुळे तीन्ही लग्न फार काळ काही टिकली नाहीत. त्यामुळे बॉडीगार्डवरच फिदा झालेली पामेलाने अखेर जीवनसाथी म्हणून बॉडीगार्डचीच निवड केली आहे. डॅन हायर्स्ट अशा तिच्या पतीचे नाव आहे.  विशेष म्हणजे पामेला आता ५२ वर्षाची आहे. 

याआधीही पामेलाने रॉकर्स टॉमी ली आणि किड रॉकसह लग्न केले होते. यानंतर दोन वेळा तिने लग्न केले प्रोफेशनल पोकर रिक सॉलोमॉनसह तिने लग्न केले पण काहीही केले तर पामेलाचे वैवाहीक आयुष्य काही सुरळीत सुरु झाले नाही. काही लोकांना पामेलाने पाच वेळा लग्न केल्याचे वाटते. मात्र हे माझे चौथेच लग्न असल्याचे तिने मध्यंतरी स्पष्ट केले होते.  पामेला तिच्या करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते.

जगाच्या कानाकोप-यात पामेलाचे चाहते आहेत. भारतातही तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. भारतात तिची लोकप्रियता बघता बिग बॉस शोमध्येही तिला आमंत्रित करण्यात आले होते. पामेलाने शोमध्ये एंट्री करताच धुमाकुळ केला होता. पामेलाच्या एंट्रीनंतर 'बिग बॉस'ला खरा फायदा झाला होता.  बिग बॉसच्या टीआरपीमध्ये वाढ झाली होती. टीआरपी रेटींगमध्ये 'बिग बॉस'ने प्रतिस्पर्धी रियालिटी शो 'कौन बनेगा करो़डपती'ला मागे टाकले  होते. केबीसीला आतापर्यंत ४.८ इतकी टीआरपी मिळाली होती. पामेला एंडरसनच्या एंट्रीमुळे बिग बॉसने  सर्वाधिक ४.९ इतकी टीआरपी रेटिंग मिळवली होती. 


पामेलाच्या एंट्रीमुळे आतंरराष्ट्रीय मिडीयाने देखील 'बिग बॉस'मधील प्रत्येक घडामोडींची दखल घेतली होती. पामेलाचे विमानतळावर आगमन आणि तिच्या एंट्रीमुळे शोला मिळालेले प्रौढांसाठींचे सर्टिफिकेट यावर ब्रिटीश दैनिकांमध्ये खुमासदार चर्चा रंगली होती.

 

पामेलाचे पांढ-या साडीत प्रवेश करणे, अश्मित पटेलसोबत सनबाथ घेणे, धक-धक आणि मुन्नी बदनामच्या डान्सवरील ठुमके या सा-या गोष्टींवर देशातीलच नाहीतर परदेशातल्या मिडीयामध्ये जोरदार चर्चा झाली होती. याचाच परिणाम बिग बॉसच्या टीआरपी रेटिंगवरही झाल्याचे पाहायला मिळाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pamela Anderson Secretly Got Married To A Bodyguard And for the fourth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.