Oscars 2021: Fans love Riz Ahmed sweetly fixing his wife's hair on the Oscars red carpet | Oscars 2021: रिज अहमद बायकोच्या प्रेमात अन् चाहते त्याच्या प्रेमात! रेड कार्पेटवर कपलच्या केमिस्ट्रीची चर्चा!!

Oscars 2021: रिज अहमद बायकोच्या प्रेमात अन् चाहते त्याच्या प्रेमात! रेड कार्पेटवर कपलच्या केमिस्ट्रीची चर्चा!!

ठळक मुद्देयंदा प्रथमच ऑस्करमधील मुख्य अभिनेत्याच्या श्रेणीत एका मुस्लिम अभिनेत्याला नामांकन मिळाले. 

ऑस्कर सोहळ्याच्या (Oscars 2021) रेड कार्पेटवरच्या सुंदर ललनांची चर्चा नेहमीच होताना दिसते. पण यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर दिसलेल्या एका कपलच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली.
होय, अभिनेता रिज अहमद (Actor Riz Ahmed) आणि त्याची पत्नी फातिमा फरहीन मिर्झा हे कपल ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. फोटोग्राफर्सला पोज देण्यापूर्वी रिज मोठ्या प्रेमाने बायको फातिमाचे केस सावरताना दिसला. एक मिनिट थांबा, असे फोटोग्राफर्सला म्हणत तो बायकोकडे वळला आणि त्याने फातिमाचे केस नीट केले. 

रिज फातिमाचे केस नीट करत होता आणि फातिमा नव-याच्या या वागण्याने सुखावली होती. त्याचा आनंद तिच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. या कपलने फोटोग्राफर्सला मस्तपैकी पोज दिल्यात. पण खरी त्यांच्या लव्ह केमिस्ट्रीची होती. ऑस्करच्या रेड कार्पेटवर रिजच्या वागण्याचे कौतुक करताना सध्या चाहते थकत नाहीयेत. सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

यावेळी रिजने ब्लॅक कलरचा सूट परिधान केला होता तर फिक्या आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये होती.

कोण आहे रिज
यंदा प्रथमच ऑस्करमधील मुख्य अभिनेत्याच्या श्रेणीत एका मुस्लिम अभिनेत्याला नामांकन मिळाले. त्याचे नाव रिज अहमद. रिजला ‘साऊंड ऑफ मेटल’साठी (Sound Of Metal)  या यंदाच्या बेस्ट अ‍ॅक्टर इन लीडिंग रोल विभागात नामांकित मिळाले. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Oscars 2021: Fans love Riz Ahmed sweetly fixing his wife's hair on the Oscars red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.