ठळक मुद्दे रेड कार्पेटवर दिमाखात मिरवणा-या काही ललनांच्या ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या.

ऑस्करच्या यंदाच्या सोहळ्यातही (Oscars 2021 ) चर्चा रंगली ती सेलिब्रिटींच्या फॅशनची. रेड कार्पेटवर दिमाखात मिरवणा-या काही ललनांच्या ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या. तर काहींचे ड्रेस पाहून अनेकांनी नाके मुरडली. अगदी सोशल मीडियावरही याची चर्चा झाली. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.

यावर्षी worst-dressed च्या यादीत सर्वात वरचे नाव कुणाचे होते तर अभिनेत्रह  Andra Day हिचे.  बेस्ट अ‍ॅक्ट्रेस श्रेणीत नामांकन मिळालेली अ‍ॅन्ड्रा गोल्डन कलरच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उतरली. पण तिचा हा लूक चाहत्यांना आवडला नाही.

अभिनेत्री Laura Dernचा फेदर ड्रेसची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली. या ड्रेसवरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.

हार्ट शेप हँडबॅग

रेड कार्पेटवर उतरलेली अभिनेत्री Celeste Waite हिच्या छोट्याशा हार्ट शेप हँडबॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

याच्या दाढीने केली कमाल

स्विडीश गीतकार Fat Max Gsus याच्या आगळ्यावेगळ्या दाढीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Oscars 2021: Best Actress nominee Andra Day leads worst-dressed list at the Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.